"मी एका घटस्फोटित आई-वडिलांची मुलगी", डिवोर्सवर पहिल्यांदाच व्यक्त झाली गिरीजा ओक
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Girija Oak : गिरीजा ओकच्या आई-वडिलांचा म्हणजेच डॉ. गिरीश ओक आणि पद्मश्री पाठक यांचा घटस्फोट झाला होता. आता गिरीजा ओक आई-वडिलांच्या डिव्होर्सवर पहिल्यांदाच व्यक्त झाली आहे.
नॅशनल क्रश गिरीजा ओकची सोशल मीडियावर चर्चा आहे. गिरीजाच्या साड्यांचं कलेक्शन, बिच साईट फोटोशूट हे सगळं व्हायरल झालं. पण नुकत्याच एका मुलाखतीत गिरीजा ओक पहिल्यांदाच तिच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलली आहे. हॉटरफ्लाई चॅनलच्या मुलाखतीत गिरीजाने तिला येणाऱ्या पॅनिक अटॅकचा खुलासा केलाय. पहिल्यांदाच तिने आई-वडिलांच्या डिवोर्सवर भाष्य केलं आहे.
advertisement
गिरीजा ओकचे वडील हे मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक हे आहेत. पद्मश्री पाठक आणि डॉ. गिरीश ओक यांचा लग्नाच्या काही वर्षांतच घटस्फोट झाला होता. याबाबत बोलताना गिरीजा म्हणाली,"आई-बाबा वेगळे झाल्यावर मी खूप तणावात होते असं गिरीजा या मुलाखतीत म्हणाली आहे. माझ्या आई-बाबांमध्ये मतभेद होते हे मला माहिती होतं. त्यानंतर हळूहळू वाद वाढत गेले आणि त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या गोष्टीचा मला सुरुवातीपासून खूप त्रास होत होता".
advertisement
डिवोर्सवर बोलताना गिरीजा म्हणाली," एकतर त्यावेळी मी लहान होते. मला शाळेचं, परिक्षेचं टेंशन होतं. अशा परिस्थितीत घरी अशा गोष्टी सुरू असल्या की अजून त्रास होतो. खरंतर मला तेव्हा काय व्हायचं हेच कळत नव्हतं. मला पॅनिक अॅटेक्स यायचे. खूप घाम यायचा, अस्वस्थ वाटायचं, हे सगळं मला कधीही व्हायचं म्हणजे प्रवासात, कॉलेजमध्ये, लॅबमध्ये प्रॅक्टिकलवगैरे सुरू असताना त्रास व्हायचा".
advertisement
advertisement
गिरीजा पुढे म्हणाली,"मी थेरपी आणि मेडिटेशन सुरू केलं. मी माझ्या आई-बाबांच्या डिवोर्सबाबत कुठेच काही बोलले नव्हते. कारण काय बोलायचं हेच मला कळत नव्हतं. मी एका घटस्फोटित आई-वडिलांची मुलगी आहे याचं मला कायम दडपण असतं. तेव्हा मी लहान होते. माझं लग्न झालं नव्हतं. तेव्हा मला असं वाटायचं मी माझं लग्न टिकवून दाखवेल. त्या तनावात मी अनेक वर्ष होते. त्याचदृष्टिकोनातून मी रिलेशनशिपकडे पाहत होते".
advertisement
advertisement









