Independence Day: 15 ऑगस्ट 1947 रोजी रिलीज झाला चित्रपट; लोकांनी म्हटलं 'अश्लील', तरीही झाला सुपरहिट

Last Updated:
Independence Day: भारताचा सर्वात महत्त्वाचा दिवस 15 ऑगस्ट 1947. या दिवशीच स्वतंत्र भारताचा पहिला बॉलिवूड सिनेमा रिलीज झालेला. मात्र त्यातील एका गाण्यामुळे बराच वाद झाला.
1/7
भारताचा सर्वात महत्त्वाचा दिवस 15 ऑगस्ट 1947. लाल किल्ल्यावरून पंडित नेहरू ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’चं ऐतिहासिक भाषण देत होते. रस्त्यावर मिठाईचे ताट फिरत होते, प्रत्येक घरात तिरंगा फडकत होता. आणि या आनंदसोहळ्यात, बॉलिवूडमध्येही एक अनोखा इतिहास घडत होता.

advertisement
2/7
याच दिवशी प्रदर्शित झाला ‘शहनाई’, जो स्वतंत्र भारताचा पहिला बॉलिवूड सिनेमा मानला जातो. दिग्दर्शक पी. एल. संतोषी आणि संगीतकार सी. रामचंद्र यांनी बनवलेला हा चित्रपट त्या काळातील ‘ब्लॉकबस्टर’ ठरला.

3/7
तब्बल 2 तास 13 मिनिटांचा हा चित्रपट कुटुंबभाव, प्रेमकथा आणि मनोरंजनाने भरलेला होता.पण चित्रपटाची खरी ओळख ठरलं त्याचं संगीत. विशेषत: ‘आना मेरी जान संडे के संडे’ हे गाणं. शमशाद बेगम आणि सी. रामचंद्र यांच्या आवाजातलं हे हलकंफुलकं, नाचता-गाता गाणं प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावून गेलं.

4/7
पियानो, ड्रम्स आणि जॅझच्या लयीतलं हे गाणं त्या काळच्या पारंपरिक संगीतात धाडसी प्रयोग मानलं जातं. गाण्याच्या लोकप्रियतेसोबतच यावर टीकाही झाली. काही ज्येष्ठांनी या गाण्याला अश्लील म्हटलं.

5/7
‘फिल्म इंडिया’ मासिकात छापलेल्या एका पत्रात लिहिलं होतं “अशा गाण्यांमुळे तरुण मन नैतिकदृष्ट्या भ्रष्ट होऊ शकतं”. मात्र तरुण पिढीसाठी हे गाणं म्हणजे स्वातंत्र्याच्या पहिल्या श्वासासारखं मोकळं, आनंदी आणि बंधनमुक्त होतं.

6/7
चित्रपटात गावातील साधी मुलगी आणि परदेशी मुलगा नाचताना दाखवलेला प्रसंग प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्यांनी दाद दिली. गाणं बाजारपेठेत, कॅफेमध्ये, अगदी आकाशवाणीवरही सतत वाजायचं.

7/7
आज, 79 वर्षांनंतरही हे गाणं YouTube वर ऐकलं की, 1947च्या त्या ऐतिहासिक दिवशी परत गेल्यासारखं वाटतं जेव्हा देश नव्याने जन्म घेत होता, आणि रुपेरी पडद्यावर ‘शहनाई’ स्वातंत्र्याचा आनंद वाजवत होती.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement