Jatin Suri : 'अनुपमा'च्या सेटवर गोंधळ, पोलिसांनी थेट अभिनेत्यालाच उचललं, पण नेमकं प्रकरण काय?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Anupama TV show : 'अनुपमा' शोमधील अभिनेता जतिन सूरीवर गर्लफ्रेंडने आरोप लावले आहेत. पोलिसांनी सेटवर जाऊन चौकशी केली.
advertisement
सध्या ३० वर्षीय जतिन सूरी जानेवारी २०२५ पासून ‘अनुपमा’ या टीआरपी टॉपर्सपैकी एक असलेल्या मालिकेत झळकत आहे. त्याने याआधीही ‘एक था राजा एक थी रानी’, ‘निमकी मुखिया’, ‘क्लास ऑफ 2020’, ‘सौभाग्यवती भव 2’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. शिवाय, त्याने संगीत व्हिडिओ ‘गुजरा ज़माना’ मध्येही काम केले आहे. सोशल मीडियावर तो सक्रिय असून, त्याचे इंस्टाग्रामवर जवळपास 89.5k फॉलोअर्स आहेत.
advertisement
advertisement
जतिनच्या गर्लफ्रेंडने नेमके कोणत्या मुद्द्यावरून तक्रार केली आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. खुद्द जतिननेही या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. इंडिया फोरमने यासंदर्भात संपर्क साधल्यानंतर त्याने मौन बाळगणे पसंत केले. प्रोडक्शन हाऊस किंवा चॅनलनेही अद्याप यावर कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.
advertisement
advertisement








