माधुरी दीक्षित बनली 'मिसेस देशपांडे'! 25 वर्षांनी लहान मराठमोळ्या अभिनेत्यासोबत स्क्रिन शेअर करणार

Last Updated:
Madhuri Dixit : मिसेस देशपांडे या नव्या सीरिजमध्ये माधुरी दीक्षित एका वेगळ्याच अंदाजात दिसणार आहे. तिच्याबरोबर मराठमोळा अभिनेता देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
1/7
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आता सिनेमात फार दिसत नसली तरी अनेक कार्यक्रमांधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. दरम्यान माधुरीच्या नव्या वेब सीरिजची नुकचीच घोषणा करण्यात आली आहे. माधुरी दीक्षित थ्रिलर जॉनरच्या सीरिजमध्ये दिसणार आहे.

advertisement
2/7
'मिसेस देशपांडे' असं माधुरीच्या नव्या वेब सीरिजचं नाव आहे. हा एक सायकोलॉजिकल थ्रिलर ड्रामा असणार आहे. या सीरिजमध्ये माधुरीचं आतापर्यंत कधीच न पाहिलेलं रूप पाहायला मिळणार आहे. सीरिजच्या पहिल्या टीझरमध्येच याची झलक पाहायला मिळाली आहे.

3/7
'मिसेस देशपांडे' या वेब सीरिजमध्ये माधुरीबरोबर एक प्रसिद्ध मराठी अभिनेता देखील दिसणार आहे. माधुरी तिच्यापेक्षा तब्बल 24 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्याबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे. हा अभिनेता कोण आहे याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

4/7
माधुरीसोबत 'मिसेस देशपांडे' या सीरिजमध्ये स्क्रिन शेअर करणारा मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आहे. सिद्धार्थ चांदेकर धकधक गर्लबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे. सिद्धार्थ माधुरीपेक्षा 24 वर्षांनी लहान आहे. दोघांना एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.

5/7
सिद्धार्थ चांदेकरने 'मिसेस देशपांडे'चा टीझर शेअर करत तो सीरिजचा भाग असल्याचं सांगितलं आहे. My Next! Details Soon! असं कॅप्शन देत सिद्धार्थने 'मिसेस देशपांडे'चा टीझर शेअर केला आहे.

6/7
'मिसेस देशपांडे'चा टीझर दमदार असल्याचं पाहायला मिळतंय. टीझरमध्ये माधुरी आधी पारंपरिक लुकमध्ये दिसतेय. तयार होऊन ती आरशासमोर उभी राहते.  दागिने काढते, मेकअप पुसते. खाली वाकते आणि अचानक वेगळ्याच लुकमध्ये समोर येते.

7/7
'मिसेस देशपांडे' ही सीरिज जिओहॉटस्टारवर पाहता येणार आहे. नागेश कुकुनूर यांनी सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement