2 तास 10 मिनिटांची ही फिल्म, 325 कोटींची कमाई, OTT वर ट्रेडिंग, आता थेट ऑस्करच्या शर्यतीत
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Oscar 2025 : 2 तास 10 मिनिटांचा एक चित्रपट 2025 चा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केल्यानंतर हा OTT वर ट्रेडिंगमध्ये आला. आता हा चित्रपट थेट ऑस्करच्या शर्यतीत पोहोचला आहे.
'महावतार नरसिम्हा' ही पौराणिक कथांवर आधारित अॅनिमेटेड फिचर फिल्म रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. अश्विन कुमार दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 325 कोटी रुपयांची कमाई केली आहे. देशातील सर्वाधिक कमाई करणारी ही पहिली अॅनिमेशन फिल्म ठरली आहे. 40 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती.
advertisement
advertisement
'महावतार नरसिम्हा' हा चित्रपट परदेशात क्वालिफाइंग कमर्शियल थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला आहे. ऑस्कर अवॉर्डसाठीच्या पात्रता नियमांनुसार, अमेरिकेत एका ठिकाणी सलग किमान 7 दिवसांपर्यंत, दररोज किमान 3 शो प्रदर्शित झाल्यानंतर त्या चित्रपटाची शॉर्टलिस्टिंग केली जाते. नियम असा देखील आहे की त्या शोमध्ये कमीत कमी एक शो संध्याकाळी 6 ते रात्री 10 या प्राईम टाइमदरम्यान झाला पाहिजे.
advertisement
'महावतार नरसिम्हा' या चित्रपटाची निर्मिती होम्बळे फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत करण्यात आली आहे. भगवान विष्णूच्या दोन अवतारांची म्हणजेच वराह आणि नरसिंह यांची कथा या चित्रपटात दाखवली आहे. महावतार सिनेमॅटिक युनिव्हर्स’ मधील ही पहिली फिल्म आहे. भारतातील थिएटर्समध्ये ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर आता ही फिल्म नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मवरही रिलीज झाली आहे. ओटीटीवरही हा चित्रपट रिलीज झाल्यापासून ट्रेडिंगमध्ये आहे.
advertisement
advertisement
advertisement


