Mumbai News : मुंबई विमानतळावर मोठी कारवाई, उशांच्या खोळीतून 6 कोटी रुपयांच्या मालाची तस्करी, 2 घटनांनी खळबळ
Last Updated:
Mumbai Ganja Case : मुंबई विमानतळावरील सीमाशुल्क विभागाने उशांच्या कव्हरमध्ये लपवलेला सहा कोटींचा गांजा जप्त केला. या प्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबई विमानतळावर एका धक्कादायक गांजा तस्करी प्रकार उघडकीस आला आहे. सीमाशुल्क विभागाने दोन प्रवाशांच्या उशांच्या कव्हरमधून तब्बल सहा कोटी रुपयांच्या गांजाची तस्करी रोखलेली आहे. बँकॉकहून मुंबई आलेल्या एफ.एफ. रंगवालाला याला तस्करीसाठी अटक करण्यात आली तर दुसऱ्याकडून किती कोंटी गांजा जप्त केला असेल ते एकदा खालीलप्रमाणे पाहा.
मुंबई विमानतळावर एकापाठोपाठ दोन गंभीर घटना
तपासात समोर आले की, प्रवाशाने उशांच्या दोन खोळींच्या आत फुले आणि फळांच्या खाली गांजा लपवला होता. या प्रकारातून प्रवाशांनी बऱ्याच काळापासून तस्करीसाठी हा मार्ग वापरल्याची शक्यता आहे. तर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी सांगितले की, उशांच्या खोळींच्या चौकशीत सामान्य बॅगेची तपासणी केली असता गांजा लपवलेला आढळला. हा प्रकार विमानतळ सुरक्षा आणि प्रवाशांच्या तपासणीत किती सावधगिरी बाळगली जाते, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. रंगवालाच्या बॅगेत एकुण 12 पाकिटांतून हा गांजा सापडला, ज्याची बाजारातील किंमत तब्बल सहा कोटी रुपये आहे.
advertisement
या तस्करीच्या प्रकरणामुळे मुंबई विमानतळावरील सुरक्षा चाचणीला मोठा धक्का लागला आहे. तर दुसऱ्या प्रकरणातही बँकॉकहून आलेल्या ए.बी. हसम या प्रवाशाला 6 कोटींच्या गांजा तस्करीसाठी अटक करण्यात आली आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये प्रवाशांनी उशांचा वापर करून गांजा लपवण्याचा धाडसी प्रयत्न केला होता.
सीमाशुल्क विभागाने या प्रकरणाचा तपास सुरु केला असून, पुढील चौकशीत गांजा आणणाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. अधिकारी म्हणतात की, आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा तपास आणि बॅगेची काटेकोर तपासणी केल्यामुळेच या मोठ्या तस्करीला आळा बसला आहे.
advertisement
मुंबई विमानतळावरील या प्रकरणाने एकदा पुन्हा लक्ष वेधले आहे की तस्करीसाठी प्रवाशी विविध पद्धती वापरत असतात पण सीमाशुल्क विभाग सतत सतर्क आहे. नागरिकांनीही अशा धोकादायक तस्करीविषयी माहिती दिल्यास मदत होऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 27, 2025 10:07 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : मुंबई विमानतळावर मोठी कारवाई, उशांच्या खोळीतून 6 कोटी रुपयांच्या मालाची तस्करी, 2 घटनांनी खळबळ


