Kalyan Shocking News : शाळा,क्लास बुडवून चिमुकली मुलं कुठे जात होती; पोलिसांकडून धक्कादायक माहिती पुढे
Last Updated:
Kalyan News : कल्याणमधील एका गेम झोनवर पोलिसांची धडक कारवाई करताना शेकडो अल्पवयीन मुले-मुली शाळा आणि ट्युशन बुडवून गेम खेळताना आढळली. बेकायदेशीर आणि अंधाऱ्या जागेत सुरू असलेल्या या गेम झोनमधून तिघांना अटक करण्यात आली.
कल्याण : कल्याण पूर्वेतून एक भागातून पालकांना हादरवून टाकणारी घटना घडली आहे. जिथे अभ्यासाच्या नावाखाली घरातून बाहेर पडलेली अल्पवयीन मुलं-मुली नको त्या ठिकाणी पोलिसांना दिसून आलेली आहे. या घटनेने पालकांच्या पायाखालची जमिनच सरकली आहे. नेमकं कल्याण पूर्वेत काय घडलं ते सविस्तर जाणून घ्या.
शाळेऐवजी गेम झोनमध्ये मुलं
सर्व समोर आलेला प्रकार हा कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरातील आहे . जिथे अभ्यासाच्या नावाखाली घरातून बाहेर पडणारी अल्पवयीन मुले-मुली प्रत्यक्षात शाळा आणि क्लास बुडवून गेम झोनमध्ये तासन् तास खेळ खेळत बसलेली आढळली. पोलसांनी केलेल्या छाप्यामुळे हा प्रकार सर्वांच्या समोर आलेला आहे.
धक्कादायक म्हणजे चक्क काही मुलं- मुली धूम्रपान, बीअर हातात घेऊन फिरताना दिसले यामुळे पोलिसही थक्क झाले. पालकांना आपल्या मुलांचे आयुष्य अशा प्रकारे चालले आहे याची कल्पनाही नव्हती.
advertisement
कोळसेवाडी पोलिसांना स्थानिकांकडून या बेकायदेशीर गेम झोनची माहिती मिळताच कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल होंडे यांनी तातडीने छाप्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी येऊन धाड टाकली. कोणतीही परवानगी नाही त्यात सुरक्षा यंत्रणा नाही, अग्निशमन साधनांची तर पुसटशी कल्पनाही नाही. अंधारात बसवलेल्या मशीनवर शेकडो मुलं-मुली बेभान गेम खेळताना दिसली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 27, 2025 11:33 AM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan Shocking News : शाळा,क्लास बुडवून चिमुकली मुलं कुठे जात होती; पोलिसांकडून धक्कादायक माहिती पुढे










