Relation In Pregnancy : प्रेग्नन्सीत शारीरिक संबंध ठेवू शकतो का? डॉक्टर म्हणाले हो, पण फक्त याचदिवशी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Physical Relation In Pregnancy Is Safe Or Not : सामान्यपणे अनेकांना वाटतं की प्रेग्नन्सीत शारीरिक संबंध ठेवू नये, यामुळे बाळाच्या डोक्याला इजा होईल किंवा त्याला आणखी काहीतरी दुखापत होईल, गर्भपात होईल अशी भीती असते.
advertisement
advertisement
advertisement
डॉ. प्रियांका यांनी सांगितलं, प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 महिन्यांत शारीरिक संबंध ठेवणं टाळा. कारण यावेळी इन्फेक्शन, ब्लीडिंग आणि गर्भपाताचा धोका जास्त असतो. पण नंतरचे 3 महिने म्हणजे चौथा, पाचवा, सहावा महिना तुम्ही शारीरिक संबंध ठेवू शकता, हा कालावधी खरंतर प्रेग्नन्सीतील हनीमूनचा कालावधी मानला जातो
advertisement
पुढे त्या म्हणाल्या, तुमच्या प्रेग्नन्सीत काही समस्या नसेल तर या काळातील शारीरिक संबंध सुरक्षित मानले जातात. त्यानंतर शेवटचे तीन महिने विशेषत: नवव्या महिन्यात तर काही वेळा किंवा काही डॉक्टर स्वतःच कपल्सना रिलेशन ठेवण्याचा सल्ला देतात. याचं कारण म्हणजे वीर्यात असलेले लिक्टेक्ट एंझाइम बहुतेक वेळा नैसर्गिक प्रसूतीमध्ये मदत करतात"
advertisement
advertisement


