'रोज थोडं-थोडं मरण्यापेक्षा विष खाऊन झोपते'; नवविवाहितेच्या सुसाइड नोटमधील शेवटचे शब्द मन हेलावून टाकणारे

Last Updated:

नेहा पवारने नाशिकच्या हिरावाडीमध्ये मानसिक छळ, संशय आणि अत्याचाराला कंटाळून विष प्राशन केले. पोलिसांनी सात पानी चिठ्ठी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

News18
News18
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक: ज्या संसाराची स्वप्ने पाहून नववधूनं अग्निसाक्षीने नव्या आयुष्याची सुरू केली, तो काचेसारखा संसार अवघ्या सहा महिन्यांतच मोडला. नाशिकमधील हिरावाडी परिसरात नेहा पवार या नवविवाहितेने विष प्राशन करून आपले जीवन संपवल्याची अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली. याआधी तिने सात पानांची चिठ्ठी लिहून पती, सासू आणि नणंदेकडून होणारा मानसिक छळ, चारित्र्यावर संशय आणि लैंगिक अत्याचाराच्या वेदनांना कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचललं असं सांगितलं. टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी सहा ते सात पानी सुसाइड नोट लिहून, तिने माहेरच्यांना पाठवलेले मदतीचे ते अखेरचे शब्द वाचणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारे आहेत.
चिठ्ठी लिहून भावाला विनंती
नेहाने लिहिलेल्या सुसाइड नोटमधील प्रत्येक ओळ त्यांच्या वेदना आणि जगण्यासाठीची धडपड दाखवते. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी तिने ही चिठ्ठी माहेरच्यांना पाठवताना कळकळीची विनंती केली होती. मी लिहिलेली चिठ्ठी सासरच्या लोकांना सापडली तर ते पुरावे नष्ट करतील माझा छळ करतील, म्हणून चिठ्ठीचे फोटो मी तुम्हाला पाठवत आहे. रोज थोडे थोडे मरण्यापेक्षा मी विष खाऊन झोपत आहे. सासरच्यांनी तिच्यासमोर दुसरा कोणताच पर्याय शिल्लक ठेवला नसावा असं हे चिठ्ठी वाचून तरी वाटत आहे.
advertisement
मानसिक छळ, अत्याचार आणि हुंड्यासाठी दबाव
नेहाचं लग्न जूनमध्ये 15 लाख रुपये खर्च करुन झालं. लग्नानंतर काही दिवसांतच वेगवेगळ्या पद्धतीनं मानसिक छळ सुरू झाला. नणंद सासू आणि नवऱ्याचे कान भरायची. सगळं करुनही काहीच काम करत नाही, नुसती मोबाईलवर बोलते असे सारखे टोमणे मारायची, काहीही हवं असेल तर तुझ्या माहेरातून आण, पैसे घेऊन ये असा तगादा लावला जात होता. लग्नात परंपरेनुसार आणि नवरदेवाच्या मागणीनुसार सोनं नाणं घाला असं सांगितलं.
advertisement
पतीकडून दोन महिने सतत चारित्र्यावर संशय घेऊन त्रास दिला जात होता. कौमार्य चाचणीत यशस्वी न झाल्याने पुन्हा छळ सुरू झाला. तुझं माहेरी कुणीतरी ठेवलेला आहे असे आरोप करण्यात आले. कौमार्य चाचणी यशस्वी झाल्यानंतर पतीनं चारित्र्यावर संशय घेणं कमी केलं. माहेरी आल्यावरही जास्त दिवस राहायचं नाही राहिलं तर ते माहेरच्या लोकांना उलट सुलट सांगून त्यांचे कान भरायचे, धमकी द्यायचे. या सगळ्या त्रासाला कंटाळून तिने अखेर चिठ्ठीत लिहिलं आहे रोज थोडं थोडं मरण्यापेक्षा मी एकदाच विष खाऊन झोपते. यावरुन लक्षात येईल तिचा किती भयंकर छळ होत होता.
advertisement
सासरच्या जाचाला कंटाळून तिने अखेर आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. आधी गौरी आणि आता नाशिकची ही नेहा. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सात पानांची ही चिठ्ठी ताब्यात घेतली असून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून कुटुंबियांची चौकशी सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'रोज थोडं-थोडं मरण्यापेक्षा विष खाऊन झोपते'; नवविवाहितेच्या सुसाइड नोटमधील शेवटचे शब्द मन हेलावून टाकणारे
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement