'माझं तुझ्यावर प्रेम आहे'; जय भानुशालीसोबतच्या घटस्फोटानंतर सात दिवसांतच या स्पेशल व्यक्तीसाठी माही वीजची खास पोस्ट
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Mahhi Vij : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री माही वीज आणि जय भानुशाली यांचा घटस्फोट झाला होता. पण आता माही वीजने एका स्पेशल व्यक्तीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
माहीने पुढे लिहिलं आहे,"आपण कधी कधी भांडतो आणि शांतही होतो पण शेवटी आपण पुन्हा एकमेकांकडेच येतो, कारण नदीम आणि माही मनाने एकमेकांशी जोडलेले आहेत. आयुष्य सोपं नव्हतं, पण तुझ्यासोबत सगळं अधिक चांगलं वाटतं. मी तुझ्यावर प्रेम करते, नदीम—आजही आणि कायम. कारण तू मला सुरक्षित वाटू देतोस आणि मीही तुझ्यासोबत माझ्या सगळ्या गोष्टी शेअर करते".
advertisement
जय भानुशाली आणि माही विज हे टीव्हीवरील पॉवर कपल मानले जात होते. पण आता दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत. दोघांनी 11 नोव्हेंबर 2011 रोजी लग्न केले होते आणि आता त्यांनी घटस्फोट घेतला आहे. ते तीन मुलांचे पालक आहेत. जय आणि माही वेगळे झाले असले तरी, त्यांनी एकमेकांशी मैत्री टिकवून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.










