आम्ही बदललोय! 'न्यूज 18 लोकमत' आता 'न्यूज 18 मराठी', महाराष्ट्राचं नंबर 1 चॅनल
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
News 18 Marathi : आम्ही बदललोय... आता न्यूज18 मराठी! महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या विश्वासाला सार्थ ठरवत, तुमचे लाडके चॅनल एका नव्या रूपात आणि नव्या ऊर्जेने सज्ज झाले आहे.
'मुंबई: आम्ही बदललोय... आता न्यूज18 मराठी! महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या विश्वासाला सार्थ ठरवत, तुमचे लाडके चॅनल एका नव्या रूपात आणि नव्या ऊर्जेने सज्ज झाले आहे. दर्जेदार बातम्या आणि सखोल विश्लेषणाचे हक्काचे व्यासपीठ म्हणून ओळखले जाणारे 'न्यूज18 मराठी' आता राज्याचे 'नंबर 1' न्यूज चॅनल ठरले आहे. केवळ माहिती देणे नव्हे, तर सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत महाराष्ट्राचा बुलंद आवाज बनणे हेच आमचे ध्येय आहे. म्हणूनच, निष्पक्ष आणि वेगवान बातम्यांसाठी तमाम महाराष्ट्राने दिलेल्या पसंतीमुळेच आम्ही आजही ठामपणे सांगतो— न्यूज18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा! राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'न्यूज १८ मराठी'चे नव्या रुपात लाँचिंग करण्यात आले.
न्यूज १८ मराठीचा दबदबा, मार्केट शेअरमध्ये सलग एक वर्ष नंबर १!
न्यूज १८ मराठीने टीव्ही न्यूज क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत सलग एक वर्ष 'नंबर १' आहे. बदलत्या राजकीय आणि सामाजिक वातावरणातही प्रेक्षकांनी न्यूज १८ मराठीच्या दर्जेदार बातम्यांना सर्वाधिक पसंती दिल्याचे बार्कच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
advertisement
नेटवर्क१८ (Network18) हे देशातील सर्वात मोठे 'ओम्नी-चॅनेल' न्यूज नेटवर्क आहे. या नेटवर्कमध्ये १२ हून अधिक भाषांमधील २० टीव्ही चॅनल्स आणि १३ भाषांमधील सात डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मचा समावेश आहे.
प्रमुख वृत्तवाहिन्यांचा समावेश या नेटवर्कद्वारे भारतातील काही आघाडीच्या वृत्तवाहिन्यांचे संचलन केले जाते. यामध्ये सीएनएन-न्यूज१८ (इंग्रजी), न्यूज१८ इंडिया (हिंदी), सीएनबीसी-टीव्ही१८ (इंग्रजी), सीएनबीसी बाजार, सीएनबीसी-टीव्ही१८ प्राईम आणि सीएनबीसी आवाज (हिंदी) यासह १४ प्रादेशिक वाहिन्यांचा समावेश आहे.
advertisement
डिजिटल आणि प्रिंट क्षेत्रातील दबदबा भारतातील सर्वाधिक पसंती मिळवणाऱ्या न्यूज वेबसाइट्सचे देखील हे माहेरघर आहे. न्यूज१८ डॉट कॉम (News18.com), सीएनबीसीटीव्ही१८ डॉट कॉम (CNBCTV18.com), मनीकंट्रोल (Moneycontrol.com), स्टोरीबोर्ड१८ (Storyboard18.com) आणि फर्स्टपोस्ट (Firstpost.com) यांसारख्या प्लॅटफॉर्मचा यात समावेश होतो. याशिवाय, हा समूह 'ओव्हरड्राईव्ह' (Overdrive) आणि 'फोर्ब्स इंडिया' (Forbes India) ही प्रतिष्ठित मासिके देखील प्रकाशित करतो.
advertisement
नवे उपक्रम आणि गुंतवणूक नेटवर्क१८ चा 'क्रिएटर१८' (Creator18) हा नवीन विभाग भारतातील सर्वात मोठ्या कंटेंट-क्रिएटर इकोसिस्टमपैकी एक उभा करत आहे. याद्वारे प्रभावशाली 'इन्फ्ल्युन्सर मार्केटिंग' मोहिमा आणि सोशल व व्हिडिओ-केंद्रित वाढीच्या धोरणांवर काम केले जात आहे.
तसेच, जिओस्टार (JioStar), बुकमायशो (BookMyShow) आणि ईटीव्ही (ETV) यांसारख्या आघाडीच्या मीडिया प्लॅटफॉर्ममध्येही या नेटवर्कची मोठी गुंतवणूक आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 11:04 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आम्ही बदललोय! 'न्यूज 18 लोकमत' आता 'न्यूज 18 मराठी', महाराष्ट्राचं नंबर 1 चॅनल









