फिल्म पाहिली, घोडबंदरला गर्लफ्रेंडला भेटला अन् नंतर फोनच बंद; 10 वर्षांपासून बेपत्ता आहे 'मुन्नाभाई MBBS'चा अ‍ॅक्टर

Last Updated:
Munna Bhai MBBS actor Missing : 'मुन्नाभाई MBBS' या सुपरहिट चित्रपटातील अभिनेता गेल्या 10 वर्षांपासून बेपत्ता आहे. बेपत्ता होण्यापूर्वी त्याच्यावर बलात्काराचे आरोप करण्यात आले होते.
1/7
 'मुन्नाभाई MBBS' या सुपरहिट चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणारा अभिनेता विशाल ठक्कर गेल्या 10 वर्षांपासून बेपत्ता आहे. 31 डिसेंबर 2015 रोजी मुंबईत नववर्षाचं जल्लोषात स्वागत होत होतं. त्यावेळी मुंबईतील मुलुंड परिसरात राहणाऱ्या विशालने आपल्या आईला सिनेमा पाहायला येणार का? असं विचारलं. आई थकलेली असल्याने तिने नकार दिला. त्यामुळे आईकडून 500 रुपये घेऊन विशाल स्वत:च चित्रपट पाहायला गेला. हाच आई आणि विशालमधला शेवटचा संवाद ठरला. विशाल खरंतर आपल्या मित्रांसोबत 'वॉर्स' हा हॉलिवूडपट पाहायला गेला.

advertisement
2/7
 चित्रपट पाहिल्यानंतर विशाल घरी परतलाच नाही. त्यानंतर त्याचा फोनदेखील बंद झाला. अखेर 6 जानेवारी 2016 रोजी कुटुंबियांनी विशाल बेपत्ता असल्याची तक्रार मुलुंड पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलीस तपासात विशालचं मोबाईल लोकेशन ट्रेस करण्यात आलं, तेव्हा समोर आलं की 1 जानेवारी 2016 रोजी सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी तो ठाण्यातील घोडबंदर परिसरात सुमारे 45 मिनिटं थांबलेला होता. कॉल रेकॉर्डमधून हेही स्पष्ट झालं की त्या वेळी त्याची गर्लफ्रेंड रजनी राठोड त्याच्यासोबत होती. पोलिसांनी तात्काळ रजनीची चौकशी करण्यासाठी तिला बोलावलं. रजनी ही ती व्यक्ती होती जिने शेवटचं विशालला पाहिलं होतं.

3/7
 विशालच्या गर्लफ्रेंडच्या जबाबानुसार, नववर्षानिमित्त विशाल आणि रजनी एकमेकांना भेटले होते. दोघांनी एकत्र सिनेमा पाहिला, पार्टी केली. त्यानंतर ते एका रिसॉर्टमध्ये थांबले. पुढे रिसॉर्टमधून घरी जाण्यास निघाल्यानंतर ते घोडबंदर रोडवरील एका हॉटेलमध्ये चहा प्यायला थांबले. चहा पीत असताना विशालने रजनीला सांगितलं की, तो इथून थेट अंधेरीला जाणार आहे, जिथे त्याला एका मित्राला भेटायचं आहे.

4/7
 विशालला उशीर होत होता, म्हणून तो रजनीला तिथेच सोडून रिक्षाने निघून गेला. पुढे कॉल लागत नसल्याने रजनीने तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण विशाल कुठेच सापडला नाही. त्याचदरम्यान तिला कळलं की विशालच्या पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.रजनीची चौकशी करूनही पोलिसांच्या हाती काहीही लागलं नाही.

5/7
 विशाल बेपत्ता होण्याच्या तीन महिने आधीच त्याच्या गर्लफ्रेंडने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्यामुळे विशालला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पण नंतर त्याने रजनीची माफी मागितली आणि तिनेही त्याला माफ केलं. पुढे पुन्हा एकदा त्यांचं नातं पूर्वपदावर आलं.

6/7
 विशालच्या गर्लफ्रेंडचं आता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. दुसरीकडे गेल्या 10 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या विशालची काहीही माहिती समोर आलेली नाही.

7/7
 विशालचा जन्म 15 ऑक्टोबर 1984 मध्ये एका गरिब कुटुंबात झाला होता. 2001 मध्ये आलेल्या 'चांदनी बार' या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण मुन्नाभाई MBBS या चित्रपटाच्या माध्यमातून त्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement