पलाश मुच्छलला वयाच्या 30 व्या वर्षी हार्ट अटॅक? प्रकृती स्थिर होताच डॉक्टरांनी दिली Health Update

Last Updated:
Palash Muchhal Health Upate : स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत. 23 नोव्हेंबरला ते विवाहबंधनात अडकणार होते. पण स्मृतीच्या वडिलांनी तब्येत बिघडल्याने त्यांनी लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पलाशबाबत विविध अफवा पसरू लागल्या. दरम्यान, पलाशलाही छातीत दुखू लागले आणि त्याल रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी हेल्थ अपडेट शेअर केले आहेत.
1/7
 भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि म्युझिक डिरेक्टर पलाश मुच्छल 23 नोव्हेंबर 2025 रोजी विवाहबंधनात अडकणार होते. पण स्मृती मंधानाचे वडील श्रीनिवास मंधाना यांच्या प्रकृती खालावल्याने हे लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. स्मृतीच्या वडिलांना तत्काळ सांगतीतील सर्वहित रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली आणि त्यांना 25 नोव्हेंबरला डिस्चार्ज मिळाला.

advertisement
2/7
 एकीकडे स्मृतीचे वडील रुग्णालयात दाखल असताना दुसरीकडे 24 नोव्हेंबर 2025 रोजी पलाश मुच्छलला छातीत दुखत असल्याने, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सांगलीतील SRV रुग्णालयात दाखल करण्यात आले. पलाशला हार्ट अटॅक आल्याची शक्यता वर्तवली जात होती. कारण हार्ट अटॅक आल्याची लक्षणे दिसत होती. पण डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्यानंतर हा गंभीर हार्ट अटॅक नसल्याचं स्पष्ट केलं.

3/7
 पलाशची प्रकती आता स्थिर असून त्याच्यावर उपचार करणारे डॉ. दीपेंद्र त्रिपाठी यांनी हेल्थ अपडेट शेअर केली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पलाशला अती ताण आणि चिंतेमुळे त्रास झाला आहे. पण त्याला कोणता रोग किंवा गंभीर स्वरुपाचा हार्ट अटॅक आलेला नाही".

4/7
 पलाशची हेल्थ अपडेट शेअर करत डॉक्टर म्हणाले,"पलाशच्या सर्व प्रकारच्या तपासण्या केल्यानंतर हेच स्पष्ट झाले की अती ताणामुळे त्याला त्रास झाला आहे. ECG आणि 2D इकोमध्ये पलाशला कोणतीही गंभीर समस्या असल्याची दिसली नाही".

5/7
 पलाश रुग्णालयात दाखल होताच डॉक्टरांनी लगेचच उपचार सुरू केले होते. पलाशनला आता ICU मधून बाहेर काढून सामान्य वॉर्डमध्ये हलवलं आहे. त्याची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर आहे. तसचे त्याला लवकरच डिस्चार्ज मिळणार असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. डॉक्टरांनी पलाशनला 3 आठवडे पूर्णपणे विश्रांती घेण्याचा आणि कोणत्याही तणावापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

6/7
 पलाशच्या आईने हिंदुस्तान टाइम्सलाला सांगितले होते की, पलाश आणि स्मृतीचे वडील एकमेकांवर खूप प्रेम करतात. स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडल्याचे जेव्हा कळले, तेव्हा पलाशने स्वतःच म्हटले की,"काका पूर्णपणे बरे होईपर्यंत लग्न करणार नाही". त्यामुळे दोन्ही कुटुंबांनी परस्पर सहमतीने हे लग्न काही काळ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला".

7/7
 स्मृतीच्या वडिलांना आता डिस्चार्ज मिळाला असून ते घरी परतले आहेत. पलाशलाही लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे. स्मृतीने पलाशसोबतचे फोटोही सोशल मीडियावरुन हटवले आहेत. त्यामुळे स्मृती आणि पलाश यांचं लग्न नक्की कोणत्या कारणाने पुढे ढकललं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement