Sneezing : शिंक थांबतच नाहीये, सतत शिंका येतायेत; धाराशिवच्या डॉक्टरांनी सांगितली अशी 3 कारणं, दुसरं कुणी सांगणार नाही
- Published by:Priya Lad
Last Updated:
Frequent Sneezing Causes : हिवाळ्यात थंडी म्हणून इतक्या शिंका येत असतील, असं म्हणून शिंकाकडे दुर्लक्ष केलं जातं. पण यामागील कारणांची माहिती धाराशिवच्या डॉक्टरांनी दिली आहे.
थंडी म्हणजे सर्दी आली आणि सर्दी म्हणजे शिंका. पण तुम्ही पाहाल की कधीकधी अचानक शिंका येतात आणि लागोपाठ इतक्या शिंका येतात की त्या थांबतच नाही, सतत शिंका येत राहतात... हिवाळ्यात थंडी म्हणून या शिंकाकडे दुर्लक्ष केलं जातं. पण यामागे कारणांची माहिती धाराशिवच्या डॉक्टरांनी दिली आहे.
सतत शिंका का येतात, शिंका का थांबत नाहीत यामागे 3 कारणं आहेत. धाराशिवच्या उमरगामधील डॉक्टरांनी या तीन कारणांबाबत माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. डॉ. आशुतोष पाटील असं या डॉक्टरांचं नाव.
सतत शिंका येण्याची 3 कारणं
पहिलं कारण म्हणजे अॅलर्जीक राइनायटिस : धूळ, परागकण, जुनी उशी किंवा जवळ कोणता पाळीव प्राणी असेल, परफ्युम, अगरबत्ती यामुळे ट्रिगर झालं की नाकाच्या आत इरिटेशन होतं आणि शिंका येऊ लागतात.
advertisement
Relation In Pregnancy : प्रेग्नन्सीत शारीरिक संबंध ठेवू शकतो का? डॉक्टर म्हणाले हो, पण फक्त याचदिवशी
दुसरं कारण म्हणजे नेझल म्युकोजा ड्रायनेस : नाकाला ओलावा हवा असतो. एसी, धूळ, पाणी कमी पिणं यामुळे नाक कोरडं पडतं आणि सतत शिंका सुरू होतात.
तिसरं कारण डिव्हेटेड नझल सिप्टम : म्हणजे नाकाचं हाड वाकडं असणं किंवा सूज असणं
advertisement
सतत येणाऱ्या शिंका कशा थांबवायच्या?
सतत शिंका येण्याची कारणं म्हणजे फक्त थंडी नाही तर आणखी इतरही आहेत, याबाबत तुम्हाला माहिती झाली आहे. पण आता यावर उपाय काय? सतत येणाऱ्या शिंका कशा थांबवायच्या? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. डॉक्टर आशुतोष जाधव यांनी याबाबतही माहिती दिली आहे.
ते म्हणाले, "वाफ घ्या यामुळे नाकातील सूज कमी होते.नझल स्प्रे असतात, ते तुम्ही वापरू शकता, यामुळे इरिटेशन कमी होतं. ज्या गोष्टीमुळे त्रास होतो त्या गोष्टी टाळा. जसं की परफ्युम, धूळ, धूर यापासून दूर राहा. तुम्ही झोपताना जी उशी घेता ती दर 6 महिन्यांनी बदला"
advertisement
"एलर्जी खूपच जास्त असेल तर मात्र टेस्ट करून घ्या. नाक तुमचं लक्ष वेधत आहे, त्याकडे लक्ष द्या", असा सल्ला डॉ. आशुतोष पाटील यांनी दिला आहे.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
November 27, 2025 12:22 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Sneezing : शिंक थांबतच नाहीये, सतत शिंका येतायेत; धाराशिवच्या डॉक्टरांनी सांगितली अशी 3 कारणं, दुसरं कुणी सांगणार नाही


