Teeth Problem : गोड खाल्ल्यानेच नाही तर पाण्यानेही किडतात दात; अहिल्यानगरच्या डेंटिस्टनी सांगितलं कसं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Tooth Decay Due To Water : पाणी जे सामान्यपणे आपण स्वच्छतेसाठी वापरतो. सकाळी उठलो की पाण्याने चूळ भरतो, टूथपेस्ट आणि टूथब्रशने दात घासल्यानंतर ते आपण पाण्याने स्वच्छ करतो, अशा पाण्यामुळे दात किडतात असं सांगितलं तर साहजिकच आश्चर्य वाटेल.
गोड खाऊ नको, चॉकलेट जास्त खाऊ नको, दात किडतील... अशी आपली आई किंवा आजी आपल्याला दटावत आली आहे. आपण मोठे झालो, आपल्याला मुलं झाली की आपणही तेच करतो. गोड, चॉकलेटमुळे दात किडतील असं मुलांना सांगतो. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, साध्या पाण्यामुळेही दात किडू शकतात. आता हे कसं काय? तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण अहिल्यानगरच्या डेंटिस्ट्नी यामागील कारण सांगितलं आहे.
पाणी जे सामान्यपणे आपण स्वच्छतेसाठी वापरतो. सकाळी उठलो की पाण्याने चूळ भरतो, टूथपेस्ट आणि टूथब्रशने दात घासल्यानंतर ते आपण पाण्याने स्वच्छ करतो, अशा पाण्यामुळे दात किडतात असं सांगितलं तर साहजिकच आश्चर्य वाटेल. अहिल्यानगरच्या डेंटिस्ट डॉ. महेश गव्हाणे यांच्याकडे असं एक प्रकरण आलं होतं. ज्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली आहे.
advertisement
डॉ. महेश गव्हाणे म्हणाले, माझ्याकडे एक 30 वर्षाच्या महिला आल्या होत्या. ज्यांचे दात पिवळे पडले होते, दातांचे तुकडे पडले होते, ते किडले होते, त्यांना खूप वेदनाही होत होत्या. अनेक डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की, त्यांचे दात कमजोर आहे, ठिसूळ आहेत, दातात कॅल्शिअम कमी आहे. पण नंतर समजलं की त्यांचे दात पाण्यामुळे किडले आहेत.
advertisement
त्या महिला बोअरयुक्त आणि विहिरीचं क्षारयुक्त पाणी प्यायल्या होत्या, ज्यामुळे त्यांना इनॅमल हायपोप्लेझिम नावाचा आजार झाला होता. यामध्ये दातांवर पांढरे किंवा ब्राऊन ठिपके पडणं, दात किडणं, दात तुटणं अशी लक्षणं दिसतात, असं डॉ. गव्हाणे यांनी सांगितलं.
advertisement
डॉ. गव्हाणे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत माहिती दिली आहे. आणखी एका व्हिडीओत त्यांनी दात किडन्याची आणखी काही आश्चर्यजनक कारणं सांगितली आहेत. ती खालीलप्रमाणे.
तोंड कोरडं पडणं - तोंडाने श्वास घेणं, कुठली अलर्जी किंवा एखादं औषध यामुळे तोंड कोरडं पडतं. कोरड्या तोंडामुळे लाळ कमी पडते जिचा वापर तोंडातील असिड कमी करण्यासाठी होत असतो आणि दातावरील अन्न साफ करण्यासाठी देखील होत असतो.
advertisement
आहारात साखर किंवा पिष्टमय पदार्थ जास्त असणं - अशा पदार्थामुळे तोंडातील हानिकारक बॅक्टेरिया वाढतात आणि ते दातांच्या एनेमल साठी हानिकारक असिड तयार करतात.
अनुवांशिकता - काही जणांचा जेनेटिक मेकअप असा असतो, जो दात तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये अडथळा निर्माण करतो.
दातांची रचना - तसंच काहींची दातांची रचना अशी असते की दातांमध्ये जास्त अन्न अडकतं. अशातच आहार आणि स्वछता योग्य नसेल तर दात लवकर आणि जास्त प्रमाणात किडतात.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
November 26, 2025 1:38 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Teeth Problem : गोड खाल्ल्यानेच नाही तर पाण्यानेही किडतात दात; अहिल्यानगरच्या डेंटिस्टनी सांगितलं कसं


