बीआर चोप्रांनी दिलेली 'अर्जुन'ची ऑफर, असं काय घडलं ज्यामुळे महाभारतात 'कर्ण' बनले पंकज धीर
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Pankaj Dheer : 'महाभारत' या लोकप्रिय मालिकेत कर्ण या भूमिकेसाठी पंकज धीर पहिली पसंती नव्हते. मिशी काढण्यास तयार न झाल्याने त्यांना कर्णाची भूमिका मिळाली होती.
दूरदर्शनवरील सर्वात लोकप्रिय मालिका महाभारत (Mahabharat) आजही लोकांच्या आठवणीत आहे. बी. आर. चोप्रा यांची ही मालिका तब्बल 36 वर्षांपूर्वी प्रसारित झाली होती. त्या काळात या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम दिलं होतं. या मालिकेतील पात्रं आजही लोकांच्या मनात घर करून आहेत. महाभारतातील कर्ण अर्थात अभिनेते पंकज धीर यांचं कॅन्सरने निधन झालं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
लेखक डॉ. राही मासूम रजा आणि पंडित नरेंद्र शर्मा यांनी पंकज यांना सुरुवातीला अर्जुनच्या भूमिकेसाठी निवडलं होतं. पंकज धीर खूप उत्साहित होते आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्टदेखील साइन केला होता. पण काही महिन्यांनी चोप्रा यांचा विचार बदलला आणि त्यांनी पंकज यांना ऑफिसमध्ये बोलावलं. त्यांनी सांगितलं की आता त्यांना कृष्णाची भूमिका करायची आहे, पण यासाठी त्यांना आपली मिशी कापावी लागेल.
advertisement
advertisement
पंकज धीर आपल्या निर्णयावर ठाम होते. चोप्रा मात्र त्यांना समजावत होते की एखाद्या कलाकाराला भूमिकेसाठी कधी-कधी आपला लुक बदलावा लागतो. पण पंकज काहीही ऐकायला तयार नव्हते. हे पाहून बी. आर. चोप्रा खूप रागावले आणि त्यांनी पंकज यांना ऑफिसमधून हाकलून दिलं आणि म्हणाले,"बाहेर जा, पुन्हा कधी येऊ नकोस." पुढे चोप्रा यांनी पंकज यांना कर्णची भूमिका ऑफर केली.