Riteish Deshmukh Fees : 22 वर्षांचं करिअर, 60 हून अधिक सिनेमात काम, एका फिल्मसाठी किती पैसे घेतो रितेश देशमुख?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Riteish Deshmukh Fees : अभिनेता रितेश देशमुखने तुझे मेरी कसम या सिनेमातून डेब्यू केला. तब्बल 22 वर्ष तो इंडस्ट्रीत काम करतोय. त्याने आतापर्यंत 60 हून अधिक सिनेमात काम केलं आहे. एका फिल्मसाठी रितेश देशमुख किती पैसे घेतो माहितीये?
advertisement
मराठमोळा रितेश देशमुख गेली अनेक वर्ष बॉलिवूड सिनेमांमध्ये काम करतोय. 'तुझे मेरी कसम' या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. 'मस्ती', 'क्या कूल हैं हम', 'ब्लफमास्टर', 'मालामाल वीकली', 'हे बेबी', 'धमाल', 'हाऊसफुल', 'डबल धमाल', 'क्या सुपर कूल है हम', 'एक विलेन' अशा अनेक हिंदी सिनेमात रितेशनं काम केलं आहे.
advertisement
'लई भारी' या सिनेमाच्या निमित्तानं अभिनेता रितेश देशमुखनं मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. त्याआधी त्याने 'बालक पालक' या मराठी सिनेमात निर्माता म्हणून डेब्यू केला. त्यानंतर 'लई भारी' सिनेमातून तो अभिनेता म्हणून समोर आला. त्यानंतर त्याची निर्मिती, दिग्दर्शन आणि अभिनय असलेला 'वेड' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणला. हा सिनेमात मराठीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत तिसरा सिनेमा ठरला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
रितेशचा 'रेड 2' हा सिनेमा देखील काही महिन्यांआधी रिलीज झाला. या सिनेमासाठी रितेशनं 4 कोटी मानधन घेतल्याचं बोललं जात आहे. तर मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन रितेशने होस्ट केला होता. या सीझनच्या प्रत्येक एपिसोडसाठी रितेशनं जवळपास 25-30 लाख रुपये मानधन घेतल्याचं बोललं जात. याबाबत रितेशनं अधिकृत माहिती दिलेली नाही.


