स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छलच्या वयात अंतर किती? जाणून घ्या
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Smriti Mandhana Palash Muchhal Age Diffeence : स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. जाणून घ्या स्मृती आणि पलाश यांच्या वयात किती अंतर आहे.
क्रिकेटर स्मृती मंधाना आणि फेमस म्युझिक डिरेक्टर पलाश मुच्छल काही दिवसांपासून आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. 23 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार होता. पण काही कारणाने त्यांचं लग्न पुढे ढकलण्यात आलं. सध्या दोघांच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.
advertisement
स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल 6 वर्षांच्या डेटिंगनंतर 23 नोव्हेंबरला लग्न करणार होते. सांगलीत त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार होता. त्यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याचे म्हणजेच हळद, मेहंदी आणि संगीतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 2019 मध्ये त्यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली होती. एका म्युझिक इव्हेंटमध्ये दोघांची पहिली भेट झाली होती. यावेळी एक कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची भेट झाली होती.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


