नवऱ्यासमोरच बायकोचा इतर पुरुषांसोबत रोमान्स, 119 मिनिटांची सायकोलॉजिकल-थ्रिलर मूव्ही; पाहून येईल अंगावर काटा
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Best Psychological Thriller Film OTT : ओटीटीवरील एक एरॉटिक, सायकोलॉजिक थ्रिलर फिल्म प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. पत्नी आपल्या पतीसमोरच इतर पुरुषांसोबत संबंध ठेवते असं या सिनेमाचं कथानक आहे.
advertisement
advertisement
रॉटन टोमॅटोज आणि IMDb सारख्या रिव्ह्यू साइट्स चित्रपटाच्या यशाचं प्रतिबिंब दाखवतात. सपोर्टिंग कास्टचा रोलही कथेला बळकट बनवतो आणि कधी कधी मुख्य कलाकारांपेक्षा सहायक भूमिकेतील कलाकार जास्त भाव खातात. 'डीप वॉटर' ही एक एरॉटिक सायकोलॉजिकल थ्रिलर फिल्म आहे. 18 मार्च 2022 रोजी हा चित्रपट थिएटमध्ये रिलीज झाला होता. एड्रियन लाइन यांनी दिग्दर्शित केलेली ही फिल्म त्यांच्या 20 वर्षांच्या ब्रेकनंतरचं कमबॅक होतं.
advertisement
जॅक हेल्म आणि सॅम लेविन्सन यांनी या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहीली आहे. पॅट्रिशिया हाईस्मिथ यांच्या 1957 च्या कादंबरीवर आधारित ही फिल्म आहे. मुख्य कलाकारांमध्ये बेन अ‍ॅफलिक यांनी ‘विक व्हॅन अ‍ॅलन’ची भूमिका केली आहे, तर अ‍ॅना डी आर्मसने त्यांची पत्नी ‘मेलिंडा’ची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे शूटिंग न्यू ऑरलियन्समध्ये झाले असून फक्त 119 मिनिटांचा हा चित्रपट आहे.
advertisement
एका दिवशी दोघे एका पार्टीला जातात. तिथे मेलिंडा ‘जो’ नावाच्या माणसासोबत खूप वेळ घालवते. हे पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटतं, पण विक शांत राहतो. विक नंतर जोकडे जातो आणि त्याला सांगतो की पत्नीशी संबंध ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याने कसं मारलं आहे. तो जोला धमकावतोही. पण मेलिंडा जोला घरी बोलावते. ते दोघे विकच्या समोरच बेडरूममध्ये वेळ घालवतात. त्यामुळे विक खूप दुखावतो आणि नंतर तो जोचा खून करतो.
advertisement
'डीप वॉटर' या चित्रपटाची कथा विक आणि मेलिंडा या श्रीमंत दांपत्याभोवती फिरते. घटस्फोट टाळण्यासाठी ते एक विचित्र करार करतात. मेलिंडाला अफेअर्स करण्याची मुभा आहे, पण त्याबदल्यात विक त्यांच्या नात्यातील रहस्यांवर नियंत्रण ठेवतो. मेलिंडाचे अनेक प्रियकर रहस्यमयरीत्या गायब होऊ लागतात, ज्यामुळे विकवर संशय निर्माण होतो. विकला शिंपले पाळण्याचा छंद असतो. यातून त्याचा धोकादायक स्वभाव पाहायला मिळतो.
advertisement
'डीप वॉटर' या चित्रपटाची कथा विक आणि मेलिंडा या श्रीमंत दांपत्याभोवती फिरते. घटस्फोट टाळण्यासाठी ते एक विचित्र करार करतात. मेलिंडाला अफेअर्स करण्याची मुभा आहे, पण त्याबदल्यात विक त्यांच्या नात्यातील रहस्यांवर नियंत्रण ठेवतो. मेलिंडाचे अनेक प्रियकर रहस्यमयरीत्या गायब होऊ लागतात, ज्यामुळे विकवर संशय निर्माण होतो. विकला शिंपले पाळण्याचा छंद असतो. यातून त्याचा धोकादायक स्वभाव पाहायला मिळतो.
advertisement
'डीप वॉटर' हा चित्रपट अनेक ट्विस्ट आणि टर्नने भरलेला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना सुरूवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. अनेक हत्या केल्यानंतर विक पोलिसांच्या जाळ्यात अडकतो का? मेलिंडा असं का करतेय? ती खरंच विकवर प्रेम करते का? की यामागे काही वेगळंच कारण आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून प्राईम व्हिडीओवरील 'डीप वॉटर' हा चित्रपट पाहा.


