'तुम्ही ते नाकारू शकत नाही', ट्रोल होणाऱ्या सचिन पिळगांवकरांची मराठी दिग्दर्शकानं घेतली बाजू
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Lshitij Patwardhan Support Sachin Pilgaonkar : हिंदी सिनेमा गाजवणारा प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक आणि लेखक क्षितिज पटवर्धन याने ट्रोल होणाऱ्या सचिन पिळगांवकर यांची बाजू घेतली आहे. त्याने सचिन पिळगांवकर यांच्याबद्दल त्याचं मत व्यक्त केलं आहे.
ज्येष्ठ मराठी अभिनेते सचिन पिळगांवकर हल्ली त्यांच्या मुलाखतींमुळे, त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. सचिन पिळगांवकर यांना त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं. त्यांनी कुठे काही बोललं तरी त्यांचं ट्रोलिंग आणि मिम्स व्हायरल होतात. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी याबाबत सचिन पिळगांवकर यांची बाजू घेत आपलं मतं मांडली आहे. दरम्यान प्रसिद्ध मराठी लेखक आणि दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन याने सचिन पिळगांवकर यांची बाजू घेत त्याचं त्यांच्याविषयी असलेलं मत व्यक्त केलं.
advertisement
advertisement
मुक्कामपोस्ट मनोरंजनला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगांवकर यांच्यावर होणाऱ्या ट्रोलिंगवर तो बोलला. तो म्हणाला, "याला एक दुसरी बाजू आहे. पुण्यातल्या एका मुलाला मोठ्या दिग्दर्शकापुढे उभं केलं जातं. दिग्दर्शक विचारतो, 'तू काही गाणी वगैरे लिहिली आहेस का?' त्यावर तो मुलगा म्हणतो, 'नाही सर'. ते म्हणतात 'काही हरकत नाही. पहिल्यांदा काहीतरी लिहून बघ' असं म्हणत ते त्याला पहिल्यांदा संधी देतात."
advertisement
advertisement
पुढे तो म्हणाला, "मी आणि माझ्यासारख्या असंख्य कलाकार आहेत ज्यांना फक्त कामच नाही तर आत्मविश्वासही त्या माणसाने दिला. मी त्याबद्दल खूपच कृतज्ञ आहे. आपण आपापल्या घरांमध्ये एखादी छोटी गोष्ट झाली तर आपण ती सेलिब्रेट करतो. प्रमोशन मिळालं किंवा मुलाला 80 टक्के पडले तरी आपण पन्नास जणांना व्हॉट्स अँपवर सांगतो. तेव्हा आपण म्हणतो का की किती सांगतोय."
advertisement
advertisement
advertisement
"ट्रोलिंग करणारे ट्रोलिंग करून निघून जातील, पण उद्या जर लोकांनी विचारलं की सचिन पिळगांवकर सरांनी काय करत त्यांनी काय केलं तर 'अशी बनवाबनवी'सारखा सिनेमा आहे. तेव्हा कमेन्ट कोणी लक्षात नाही ठेवणार, तेव्हा सिनेमाच लक्षात राहणार. त्यामुळे कमेंट्स की काम? हे ज्याचं त्याने ठरवायचं. मी नेहमी माणसाचं काम लक्षात ठेवणारा आहे कमेंट्स नाही."
advertisement
क्षितिज शेवटी म्हणाला, "ते जे बोलत असतील, त्यांचे मिम्स येत असतील, इंटरव्ह्यू येत असतील, जे काही असेल ते. पण त्या माणसाने ज्या लोकांची घरं उभी केलीत, ज्या माणसांना आयुष्यात विश्वास दिला. या मराठी सिनेसृष्टीला एकाहून एक चांगले दहा सिनेमे दिले हे तुम्ही नाकारूच शकत नाही. मी त्यांची ती बाजू पाहतो."


