न्यू हॉलंडचा दमदार शानदार ट्रॅक्टर, महिंद्रालाही पडेल भारी, किंमत खासियत काय आहे?

Last Updated:
Tractor News : भारतीय शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन जगभर प्रसिद्ध असलेल्या न्यू हॉलंड कंपनीने नेहमीच उच्च दर्जाची, इंधन-कार्यक्षम आणि टिकाऊ ट्रॅक्टर तयार केली आहेत.
1/5
tractor news
भारतीय शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन जगभर प्रसिद्ध असलेल्या न्यू हॉलंड कंपनीने नेहमीच उच्च दर्जाची, इंधन-कार्यक्षम आणि टिकाऊ ट्रॅक्टर तयार केले आहेत. विशेषतः ट्रॅक्टर हे मजबूत इंजिन, तंत्रज्ञान आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या कार्यक्षमतेसाठी ओळखले जातात. अशातच आता न्यू हॉलंड 5630 TX Plus हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांचा सर्वाधिक पसंती असणार ट्रॅक्टर ठरला आहे. त्याची खासियत किंमत काय आहे? हेच आपण आज जाणून घेणार आहोत..
advertisement
2/5
tractor news
खासियत काय? -  न्यू हॉलंड 5630 TX Plus मध्ये 75 अश्वशक्तीचे इंजिन देण्यात आलं आहे. जे 2300 RPM वेगाने काम करते. हे इंजिन शेतीची कठीण कामे जसे की, नांगरणी, रोटाव्हेटिंग, ट्रॉली वाहतूक सहजपणे करते. शक्तिशाली इंजिन असूनही हा ट्रॅक्टर इंधनाची बचत करतो.
advertisement
3/5
tractor news
या ट्रॅक्टरमध्ये 12 फॉरवर्ड आणि 3 रिव्हर्स गियरचा गियरबॉक्स देण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या शेती कामात ट्रॅक्टरवर पूर्ण नियंत्रण राहते. पुढील वेग 14 ते 32.07 किमी/तास, तर रिव्हर्स वेग 3.04 ते 16.21 किमी/तास इतका आहे.
advertisement
4/5
उत्तम लिफ्टिंग क्षमता
उत्तम लिफ्टिंग क्षमता - या ट्रॅक्टरची उचलण्याची क्षमता 2000 किलो आहे, ज्यामुळे जड शेती उपकरणे किंवा ट्रॉली सहज उचलता येते. त्यामुळे हा ट्रॅक्टर व्यापारी कामांसाठीही उपयुक्त आहे.
advertisement
5/5
न्यू हॉलंड 5630 TX Plus ची किंमत किती?
न्यू हॉलंड 5630 TX Plus ची किंमत किती? - भारतात या ट्रॅक्टरची एक्स-शोरूम किंमत सुमारे 14.60 लाख आहे. ही किंमत आरटीओ, विमा आणि राज्यांच्या रोड टॅक्सनुसार बदलू शकते. कंपनी या ट्रॅक्टरवर 6 वर्षांची वॉरंटी देते.
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement