'ती फसवणूक नाही...', रिया चक्रवर्तीला क्लिन चीट, सुशांतच्या मृत्यूच्या क्लोजर रिपोर्टमध्ये CBI चा मोठा खुलासा

Last Updated:
Sushant Singh Rajput case : केंद्रीय अन्वेषण विभागाने या प्रकरणी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये एक मोठा आणि महत्त्वाचा खुलासा केला आहे.
1/7
मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर मोठा गदारोळ माजला होता. सुशांतच्या कुटुंबीयांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्यावर सुशांतचा मानसिक छळ करून त्याच्या १५ कोटी रुपयांच्या मालमत्तेचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप केला होता. मात्र, आता केंद्रीय अन्वेषण विभागाने या प्रकरणी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये एक मोठा आणि महत्त्वाचा खुलासा केला आहे.

advertisement
2/7
सीबीआयने आपल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे की, सुशांत सिंग राजपूतने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असताना त्याची प्रेयसी रिया चक्रवर्तीवर स्वतःच्या मर्जीने १६.८० लाख रुपये खर्च केले होते. सीबीआयच्या मते, हा खर्च पैशांची फसवणूक मानला जाऊ शकत नाही.

3/7
या दोघांच्या नात्यादरम्यान झालेला हा खर्च एक सामान्य खर्च मानला जातो, कारण रियाने कोणतीही रक्कम जबरदस्तीने किंवा बेकायदेशीर मार्गाने सुशांतकडून घेतली नाही.

4/7
सीबीआयच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की, सुशांत एप्रिल २०१८ पासून जून २०२० पर्यंत रियासोबत लिव्ह-इनमध्ये राहत होता. तसेच, ऑक्टोबर २०१९ मध्ये या दोघांनी केलेल्या युरोप टूरची तिकिटेही सुशांतच्या सांगण्यावरूनच त्याची मॅनेजर श्रुती मोदीने बुक केली होती.

5/7
१४ जून २०२० रोजी ३४ वर्षीय सुशांत वांद्रे येथील घरी मृतावस्थेत आढळला होता, ज्यामुळे देशभर मोठा वादंग निर्माण झाला. सुशांतच्या वडिलांनी पाटणा येथे रियावर त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.

6/7
सीबीआयच्या अहवालात एक महत्त्वपूर्ण गोष्ट नमूद केली आहे. ८ जून २०२० (ज्या दिवशी रिया सुशांतचे घर सोडून गेली) ते सुशांतने आत्महत्या केली, या संपूर्ण काळात रिया चक्रवर्ती किंवा तिचा भाऊ शोविक सुशांतच्या घरी उपस्थित नव्हते.

7/7
तपासात असेही दिसून आले आहे की, सुशांतने १० जून रोजी व्हॉट्सअ‍ॅपवर शोविकशी संवाद साधला होता, पण त्याने रियाशी बोलणे टाळले होते. या 'क्लोजर रिपोर्ट'मुळे रियावरील आर्थिक फसवणुकीचे आरोप आता सीबीआयने फेटाळले आहेत.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement