'तारक मेहता का उल्टा चश्मा' सोडल्यानंतर कुठे आहे रीटा रिपोर्टर? आता केलाय हा रेकॉर्ड, जगतेय असं आयुष्य
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Rita Reporter : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या लोकप्रिय मालिकेत रीटा रिपोर्टर ही भूमिका साकारणारी प्रिया आहूजा रजदा सध्या चर्चेत आहे. मालिका सोडल्यानंतर प्रियाने आता नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.
'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेच्या माध्यमातून रीटा रिपोर्टर घराघरांत पोहोचली. ही भूमिका साकारणाऱ्या प्रिया आहूजा रजदाने आपल्या बेधडक अभिनयाने घराघरात वेगळी ओळख निर्माण केली होती. प्रिया 2009 ते 2010 या काळात मालिकेचा भाग होती. त्यानंतर 2013 ते 2022 पर्यंत सातत्याने मालिकेत ती दिसत राहिली.
advertisement
प्रिया आहूजा रजदाने काही कारणाने 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका सोडली. मालिका सोडल्यानंतरही अभिनेत्रीची लोकप्रियता कमी झालेली नाही. प्रिया सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता प्रिया पुन्हा एका खास कारणामुळे चर्चेत आहे. नुकतेच तिचे नाव एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये समाविष्ट झाले आहे.
advertisement
advertisement
advertisement
प्रियाला 75 किलो वजनासह महिला कॅटेगरीमध्ये रेकॉर्ड करायचा होता. सुरुवातीला हे सगळे मजेत सुरू झाले होते, पण नंतर ती या आव्हानाबद्दल पूर्णपणे गंभीर झाली. आता ती 60 किलो वजन सहज उचलते आणि लवकरच 75 किलोपर्यंत पोहोचण्याचा तिचा प्रयत्न आहे. या यशाचे श्रेय प्रिया आपला पती मालव रजदाला देते. कारण पतीने मुलाकडे लक्ष दिल्याने प्रियाला कोणत्याही अडथळ्याशिवाय ट्रेनिंग करता आली.
advertisement
advertisement


