आता सनई चौघडे वाजणार! तेजस्वी प्रकाशचं ठरलं, कधी आहे लग्न? समोर आल्या डिटेल्स

Last Updated:
Karan Kundrra Tejasswi Prakash : छोट्या पडद्यावरील क्यूट कपल अर्थात तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकतंच एका मुलाखतीत अभिनेत्रीने याबद्दल भाष्य केलं आहे.
1/7
 'बिग बॉस'च्या प्रत्येक पर्वात एक नवी जोडी पाहायला मिळते. 'बिग बॉस'च्या घरात या स्पर्धकांचं अफेअर सुरु होतं आणि पुढेही ते कायम राहतं. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा 2021 पासून एकमेकांना डेट करत आहेत. चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. रिपोर्टनुसार, तेजस्वी आणि करण 2026 मध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत.

advertisement
2/7
 तेजस्वी नुकतीच एका मुलाखतीत म्हणाली की, 2026 मध्ये ती विवाहबंधनात अडकू शकते. 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतरच 2022 पासून करण लग्नासाठी मागे लागला होता. पण त्यावेळी आईने विरोध केला असल्याचं अभिनेत्री म्हणाली.

3/7
 तेजस्वीने भारती सिंहच्या पॉडकास्टमध्ये लग्नबद्दल भाष्य केलं आहे. तेजस्वी म्हणाली,"माझ्या आईला वाटत होतं की लग्न करण्याआधी काही काळ मी आणि करण एकत्र राहिलो पाहिजे. त्यामुळेच आम्ही लग्न केलेलं नाही. पण 2026 मध्ये आम्ही लग्नबंधनात अडकू शकतो".

4/7
 तेजस्वी पुढे म्हणाली,"करण माझ्यासाठी सीरियस नाही, असं सुरुवातीला मला वाटत होतं. पण खरंतर तो लग्नासाठी माझ्यामागे 2022 पासूनच लागला आहे. आता नव्या वर्षात लग्न करण्याचा आम्ही विचार तर करतोय. बघू काय होतंय पुढे".

5/7
 तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा 'बिग बॉस 19'मध्ये सहभागी झाले होते. 'बिग बॉस'च्या घरात त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सध्या ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असून लवकरच लग्नबंधनात अडकतील.

6/7
 तेजस्वी आणि करण दोघांच्याही घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. दोघांच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाच्या तयारीला आता सुरुवात केली आहे. त्यामुळे 2026 मध्ये टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल शाही थाटात लग्न करतील.

7/7
 करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. आता त्यांच्या सुखद वार्तेने चाहतेदेखील सुखावले आहेत. लाडक्या जोडीवर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement