'त्यांची मुलं आणि आईवडील अतिशय...', शाहरुख खानच्या मन्नतमध्ये गेल्यावर गिरिजा ओकला आलेला शॉकिंग अनुभव
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Girija Oak about Shah Rukh Khan: शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'जवान' मध्ये अभिनेत्री गिरिजा ओकने शाहरुखच्या 'आझाद'च्या टीममधील सदस्य म्हणून काम केले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
'जवान'च्या सेटवर काम करताना गिरिजाला शाहरुखच्या कामाची विलक्षण पद्धत आणि त्याच्या कलागुणांची प्रचिती आली. लालनटॉपला दिलेल्या एका मुलाखतीत गिरिजा ओकने सांगितले, "शाहरुख सर इतरांच्या कामात अजिबात हस्तक्षेप करत नाहीत, पण त्यांच्या स्वतःच्या कामाबद्दल ते अत्यंत जागरूक असतात. त्यांची ॲक्शन कंटिन्यूटी खूप अचूक असते. इतक्या वर्षांत मी कोणत्याही अभिनेत्यात एवढं परफेक्शन पाहिलेलं नाही."
advertisement
गिरिजाने पुढे सांगितलं, "शाहरुखला त्याची ॲक्शन कंटिन्यूटी १००% आठवते. मागील शॉटमध्ये त्याने कोणता हात कुठे ठेवला, मानेची स्थिती कशी होती, हे त्यांना कोणीही आठवण करून द्यावी लागत नाही. 'जवान'मध्ये ते दुहेरी भूमिका करत असल्याने, ही गोष्ट अधिक महत्त्वाची होती, पण ते कधीही विसरले नाहीत, हे खरोखरच विलक्षण आहे."
advertisement
advertisement
advertisement


