Age Is Just A Number! चाळीशी ओलांडली तरी करिअर पिकवर, 7 अभिनेत्री करतायेत OTT वर राज्य

Last Updated:
OTT 40 Plus Actress : ओटीटीवर वयाची चाळीशी पार केलेल्या अनेक अभिनेत्रींचा सध्या बोलबाला पाहायला मिळत आहे. फक्त सौंदर्याने नव्हे तर दमदार अभिनयाने या अभिनेत्री प्रेक्षकांची मन जिंकत आहेत.
1/7
 रसिका दुग्गल (Rasika Dugal) : रसिका दुग्गल सध्या 'दिल्ली क्राईम सीझन 3'मुळे चर्चेत आहे. नोव्हेंबर महिन्यात रसिकाची ही बहुप्रतीक्षित सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. आपल्या दमदार अभिनयाने वयाच्या चाळीशीत रसिका दुग्गलने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. मंटो, मिर्झापूर ते दिल्ली क्राइम पर्यंत ओटीटीवरील अनेक लोकप्रिय वेब सीरिजचा रसिका दुग्गल महत्त्वाचा भाग आहे. आपल्या प्रत्येक भूमिकेच्या माध्यमातून रसिका प्रेक्षकांवर नव्याने छाप पाडते.

advertisement
2/7
 शेफाली शाह (Shefali Shah) : दमदार अभिनय असूनही शेफाली शाहला रुपेरी पडदा गाजवता आला नाही. पण ओटीटी विश्वाने मात्र तिचं नशीब बदललं. 'दिल्ली क्राइम' या 2019 मध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या सीरिजमध्ये शेफाली शाह महत्त्वाच्या भूमिकेत होती. तिच्या डीसीपी वर्तिका चुतुर्वेदी या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झाhलं. 'दिल्ली क्राइम'सह ओटीटीवरील थ्री ऑफ अस (Three of Us), डार्लिंग्ज (Darlings), पुंच बिट (Puncch Beat) या महत्त्वाच्या ओटीटीवरील प्रोजेक्टचा शेफाली शाह भाग आहे.

3/7
 सुष्मिता सेन (Sushmita Sen) : सुष्मिता सेनने काही काळ अभिनयक्षेत्रापासून ब्रेक घेतला होता. त्यानंतर 'आर्या' या सीरिजच्या माध्यमातून तिने जोरदार कमबॅक केलं. या सीरिजचे सर्व सीझन ओटीटीवर गाजले. पुढे 'ताली' (Taali) या ट्रान्सजेंडर कार्यकर्ता असणाऱ्या श्री गौरी सावंत यांच्या भूमिकेच्या माध्यमातून सुष्मिता प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यांची ही भूमिकाही गाजली. वयाच्या 50 व्या वर्षी सुष्मिताची 'आर्या 3' ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाली होती.

4/7
 प्रिया बापट (Priya Bapat) : छोटा पडदा, रुपेरी पडदा गाजवत असताना मराळमोठी अभिनेत्री प्रिया बापट ओटीटीवरदेखील आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. 39 वर्षीय प्रिया बापटचे ओटीटीवर 'सिटी ऑफ ड्रीम्स', 'अंधेरा' आणि 'जवान है' यासारख्या सीरिज रिलीज झाल्या आहेत. तर 'कोस्टाओ' हा चित्रपटही रिलीज झाला आहे.

5/7
 अमृता सुभाष (Amruta Subhash) : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता सुभाष अभ्यासू अभिनेत्री म्हणूनही ओळखली जाते. 46 वर्षीय अमृता सुभाषचे ओटीटीवर जारण, परिणती, बॉम्बे बीगुम्स, लस्ट स्टोरीज 2, सेक्रेड गेम्स असे अनेक चित्रपट आणि सीरिज रिलीज झाले आहेत. ओटीटीवरील बहुगुणी अभिनेत्री म्हणून अमृता सुभाष ओळखली जाते.

6/7
 नीना गुप्ता (Neena Gupta) : 66 वर्षीय नीना गुप्ता ओटीटीवरील आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. 'पंचायत' सीरिजमधील मंजू देवीच्या पात्राला नीना गुप्ताने योग्य न्याय दिला आहे. तसेच मसाबा मसाबा, वध, वध 2 अशा तिच्या अनेक फिल्म आणि सीरिज रिलीज झाल्या आहेत.

7/7
 हुमा कुरैशी (Huma Qureshi) : अभिनेत्री हुमा कुरैशी विशेषत: 'महाराणी' (Maharani) या सीरिजमुळे ओळखली जाते. यात तिने साकारलेली 'राणी भारती' ही भूमिका चांगलीच गाजली. काही दिवसांपूर्वीच या सीरिजचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तसेच 39 वर्षीय हुमा कुरैशी हिची 'हीरामंडी' ही सीरिजदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

Local Body Election : नगर परिषद नगरपालिकांचा निकाल कधी? सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट समोर
नगर परिषद नगरपालिकांचा निकाल कधी? सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट समोर
  • नगर परिषद नगरपालिकांचा निकाल कधी? सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट समोर

View All
advertisement