फक्त 1 रुपयांत अॅक्टिव्ह राहील तुमचा नंबर! ही कंपनी देतेय जबरदस्त ऑप्शन
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Vodafone Idea Rs 1 Pack Details: आजकाल, महागडे रिचार्ज प्लॅन अनेक यूझर्सवर, विशेषतः जे फक्त इनकमिंग कॉल किंवा ओटीपीसाठी दोन नंबर वापरतात. त्यांच्यावर ओझे बनत आहेत. यावेळी, एक मोठी दिलासा मिळाला आहे. तुम्ही फक्त 1 रुपयांत तुमचा नंबर अॅक्टिव्ह ठेवू शकता. त्यांच्या यूझर्सच्या गरजा लक्षात घेऊन, या टेलिकॉम कंपनीने एक बजेट प्लॅन सादर केला आहे जो सेकेंडरी सिम वापरणाऱ्यांसाठी वरदान आहे.
1 Rupee Recharge Plan: रिचार्ज प्लॅनची वाढत्या किंमती या सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरतेय. परिणामी, प्रत्येकजण स्वस्त रिचार्ज प्लॅनच्या शोधात असतो. विशेषतः जे दोन सिम वापरतात. दोन सिमसाठी रिचार्ज करणे खूप महाग ठरतं. यूजर्सची ही समस्या दूर करण्यासाठी व्होडाफोन आयडिया (Vi) ने फक्त 1 रुपयांचा बजेट-फ्रेंडली प्लॅन सादर केला आहे. चला पाहूया की हा प्लॅन काय ऑफर करतो आणि तो तुमचा मोबाइल खर्च कसा कमी करू शकतो.
advertisement
advertisement
फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, हा Vi प्लॅन यूझर्सना 75 पैशांचा टॉकटाइम आणि 1 लोकल ऑन-नेट रात्रीचा मिनिट देतो. हा प्लॅन 1 दिवसासाठी व्हॅलिड आहे. तसंच, कंपनी एसएमएस फायदे देत नाही किंवा यामध्ये एक्सटेंशन सर्व्हिस व्हॅलिडिटीची सुविधाही देत नाही. हा Vi प्लॅन कमी फायदे देत असला तरी, ज्यांना खूप कमी खर्चात टेलिकॉम फायदे मिळवायचे आहेत त्यांच्यासाठी हा बेस्ट आहे.
advertisement
हा प्लॅन या यूझर्ससाठी आहे बेस्ट : हा पॅक विशेषतः अशा यूझर्ससाठी डिझाइन केला आहे जे त्यांचा नंबर क्वचितच वापरतात. अशा लोकांना सामान्यतः इनकमिंग कॉल, बँक किंवा अॅप्समधून OTP किंवा सेकेंडरी सिम अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी लहान रिचार्जची आवश्यकता असते. हा मिनी प्लॅन कमी वापरणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरतो. 1 मिनिटांचा नाइट कॉल बेनेफिट इमर्जेंसी परिस्थितीत उपयुक्त ठरू शकतो, ज्यामुळे कमी किमतीत त्यांचा नंबर सक्रिय ठेवू इच्छिणाऱ्या यूझर्ससाठी हा बेस्ट ऑप्शन ठरतो.
advertisement


