पुणे-नाशिक महामार्गावर धावत्या एसटी बसमध्येच चालक-वाहकाला बेदम मारहाण; प्रवाशांचा जीव टांगणीला

Last Updated:

बसमध्ये मारहाण सुरू असताना, चालक आणि वाहक स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. ज्यामुळे चालत्या बसचा ताबा सुटण्याची भीती निर्माण झाली होती

एसटी बसमधील चालक-वाहकाला बेदम मारहाण
एसटी बसमधील चालक-वाहकाला बेदम मारहाण
(सचिन तोडकर, प्रतिनिधी) पुणे : पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाटात चालत्या एसटी बसमध्ये प्रवाशांच्या डोळ्यांदेखत गुंडांनी धुमाकूळ घातला. त्यांनी चालक-वाहकाला केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. काही तरुणांनी चक्क आपली थार गाडी रस्त्यात आडवी लावून बस थांबवली आणि आत घुसून ही मारहाण केली. यामुळे बसमधील सुमारे ३५ ते ४० प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.
चालत्या बसमध्ये घुसून मारहाण
ही घटना पुणे-नाशिक महामार्गावर खेड घाटाच्या हद्दीत घडली. मंचर डेपोची एसटी बस खेड येथून मंचरच्या दिशेने जात असताना, काही तरुणांनी रस्त्यात थार गाडी आडवी लावून बस थांबवली. बस थांबताच, दोन ते तीन तरुण तातडीने बसमध्ये घुसले.
त्यांनी कोणतीही विचारपूस न करता, थेट बसचे चालक आणि वाहक (कंडक्टर) यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
advertisement
बसमध्ये मारहाण सुरू असताना, चालक आणि वाहक स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. ज्यामुळे चालत्या बसचा ताबा सुटण्याची भीती निर्माण झाली होती आणि बसमधील सर्व प्रवाशांचे प्राण धोक्यात आले होते.
मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
मारहाणीचा हा संपूर्ण थरार बसमधील एका प्रवाशाने आपल्या मोबाइल कॅमेरात कैद केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, सार्वजनिक मालमत्तेत अशाप्रकारे गुंडगिरी होत असल्याने प्रवाशांमध्ये दहशत आणि संताप पसरला आहे. या मारहाणीमागील नक्की कारण अद्याप अस्पष्ट आहे. हा प्रकार रॅश ड्रायव्हिंग किंवा रस्त्यावरील वादातून घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
advertisement
मंचर पोलिसांत गुन्हा दाखल नाही
एवढी गंभीर घटना घडल्यानंतरही, ही बातमी देईपर्यंत मंचर पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी स्वतःहून या घटनेची दखल घेऊन तातडीने तपास करावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. या घटनेमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा आणि महामार्गावरील गुंडगिरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणे-नाशिक महामार्गावर धावत्या एसटी बसमध्येच चालक-वाहकाला बेदम मारहाण; प्रवाशांचा जीव टांगणीला
Next Article
advertisement
Mumbai Crime News: ना हुंड्यांची मागणी, ना संशय... या एका कारणाने ३० वर्षीय महिलेने घेतला टोकाचा निर्णय, जोगेश्वरीत खळबळ
ना हुंड्यांची मागणी, ना संशय... या एका कारणाने ३० वर्षीय महिलेने घेतला टोकाचा नि
  • ना हुंड्यांची मागणी, ना संशय... या एका कारणाने ३० वर्षीय महिलेने घेतला टोकाचा नि

  • ना हुंड्यांची मागणी, ना संशय... या एका कारणाने ३० वर्षीय महिलेने घेतला टोकाचा नि

  • ना हुंड्यांची मागणी, ना संशय... या एका कारणाने ३० वर्षीय महिलेने घेतला टोकाचा नि

View All
advertisement