Zubeen Garg Death : कोण आहे जुबिन गर्ग, ज्याचा स्कूबा डायव्हिंग करताना झाला मृत्यू? 52 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Last Updated:
Zubeen Garg Death : गायक जुबिन गर्गच्या निधनाची बातमी समोर आल्यावर सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. जुबिनचा मृत्यू सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना झालेल्या अपघातात झाला आहे.
1/7
मुंबई: ‘या अली’ हे गाणं म्हटलं की, आजही डोळ्यासमोर गायक जुबिन गर्गचा चेहरा येतो. एका गाण्याने देशभरात सगळ्यांच्या मनात घर करणाऱ्या या प्रसिद्ध गायक आणि संगीतकाराचं निधन झालं आहे.

advertisement
2/7
ही बातमी समोर आल्यावर सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. जुबिनचा मृत्यू सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना झालेल्या अपघातात झाला आहे.

3/7
जुबिनचा जन्म मेघालयमधील एका आसामी ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्याच्या आई-वडिलांनी त्याचं नाव प्रसिद्ध संगीतकार जुबिन मेहतांच्या नावावर ठेवलं होतं.

4/7
त्याचे वडील मोहिनी बोरठाकुर हे एक मॅजिस्ट्रेट होते, तर आई इली बोरठाकुर गायिका होत्या. त्यामुळे जुबिनला गाण्याचं शिक्षण त्याच्या आईकडूनच मिळालं.

5/7
जुबिनने अवघ्या तीन वर्षांच्या वयातच गाणं सुरू केलं होतं. त्याने पंडित रॉबिन बॅनर्जींकडून तब्बल ११ वर्षं तबला शिकला, तर गुरु रमणी राय यांच्याकडून आसामी लोकसंगीत शिकला.

6/7
जुबिनचं खरं नाव जुबिन बोरठाकुर होतं, पण ९० च्या दशकात त्याने आपलं आडनाव बदलून ‘गर्ग’ असं ठेवलं. त्याला देशभरात खरी ओळख २००६ मध्ये आलेल्या ‘गँगस्टर’ चित्रपटातील ‘या अली’ या गाण्याने मिळाली. यानंतर त्याने ‘सुबह सुबह’ आणि ‘क्या राज है’ सारख्या गाण्यांनाही आपला आवाज दिला.

7/7
जुबिनने फक्त आसामी किंवा हिंदीच नाही, तर बंगालीसह ४० हून जास्त भाषांमध्ये गाणी गायली आहेत. तो अनेक वर्षं आसामचा सर्वात जास्त कमाई करणारा गायक राहिला आहे.

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement