कोण आहे RJ महावश? घटस्फोटाच्या महिनाभरातच युझवेंद्र चहल Move On, आयुष्यात नव्या सुंदरेची एन्ट्री!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
युजवेंद्र चहल आणि आरजे महवश यांच्या वाढत्या जवळिकीमुळे चर्चांना उधाण आले आहे. चहलच्या घटस्फोटानंतर या अफवा अधिकच वाढल्या आहेत.
भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आरजे महवश यांची वाढती जवळीक सध्या चर्चेचा विषय बनली आहे. विशेषतः, नुकत्याच पार पडलेल्या २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल सामन्यात, चहल आणि महवश एका फ्रेममध्ये दिसले आणि सोशल मीडियावर नवनव्या चर्चांना उधाण आलं. चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटानंतर या अफवा अधिकच जोर धरू लागल्या.
advertisement
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या नात्यात दुरावा आल्यानंतर, महवश आणि चहल यांच्यातील जवळीक अधिक चर्चेत येऊ लागली. भारत आणि न्यूझीलंड सामन्यात चहलसोबत महवश स्टेडियममध्ये दिसली आणि यानंतर तिने एक इन्स्टाग्राम पोस्ट केली, "कहा था ना जिता के आऊंगी? मी टीम इंडियासाठी गुड लक आहे!" या पोस्टमधील फोटोमध्ये चहलसुद्धा असल्यामुळे चाहत्यांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले.
advertisement
advertisement
advertisement
आरजे महवशचा जन्म अलीगडमध्ये झाला असून, तिने आपलं पदवी शिक्षण अलीगड मुस्लिम विद्यापीठातून पूर्ण केलं. त्यानंतर जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली येथून पदव्युत्तर शिक्षण घेतलं. करिअरच्या सुरुवातीला तिने रेडिओ जॉकी म्हणून काम केलं आणि रेडिओ मिर्ची ९८.३ एफएम मध्ये आपल्या सुरेल आवाजामुळे प्रचंड लोकप्रियता मिळवली.
advertisement
advertisement
महवशच्या या म्हणण्यानंतरही चाहत्यांना संपूर्ण समाधान मिळालेलं नाही. सोशल मीडियावरील चर्चांमध्ये अजूनही अनेकजण म्हणत आहेत की, "धनश्रीसोबतचा घटस्फोट झाल्यानंतर लगेचच चहल महवशच्या सोबत दिसतोय, हे काही साधं नसेल!" महवशच्या म्हणण्यानुसार ती आणि चहल फक्त चांगले मित्र आहेत, पण चाहत्यांना त्यावर विश्वास ठेवणं कठीण जात आहे.