डिवोर्सच्या चर्चांदरम्यान योगिता चव्हाणचा मोठा निर्णय, चाहत्यांना दिली आनंदाची बातमी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Yogita Chavan : अभिनेत्री योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांच्या डिवोर्सच्या चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू आहेत. दोघांनीही यावर अद्याप भाष्य केलेलं नाही. दरम्यान योगितानं चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.
advertisement
दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावरून लग्नाचे सगळे फोटो तसंच अनेक व्हिडीओ डिलिट केले. दोघांनी इन्स्टाग्रामवरून एकमेकांना अनफॉलो देखील केलं. या सगळ्यावरून योगिता आणि सौरभ यांचा डिवोर्स झाल्याच्या चर्चा रंगल्या. दरम्यान डिवोर्सच्या चर्चा सुरू असतानाच अभिनेत्री योगिता चव्हाणने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. काय आहे ती आनंदाची बातमी?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
'जीव माझा गुंतला' मालिकेनंतर योगिता 'तू अनोळखी तरी सोबती' या मालिकेत दिसणार आहे. ही मालिका सन मराठीवर 5 जानेवारीपासून सुरू होणार आहे. अर्पिता असं योगिताच्या भूमिकेचं नाव आहे. अभिनेता अंबर गणपुळे या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे. योगिताला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे.


