तुम्हीही डिप्रेशनच्या गोळ्या घेताय? सावधान! निर्माण होतोय 'हा' गंभीर आजार, संशोधनात धक्कादायक खुलासा!

Last Updated:
आजकाल कामाचा ताण आणि घरगुती समस्यांमुळे डिप्रेशन वाढत आहे, ज्यामुळे अनेकजण अँटी-डिप्रेसंट्स घेत आहेत. मात्र, एका अलीकडील अभ्यासात या औषधांच्या गंभीर दुष्परिणामांवर...
1/5
 आजकाल अनेक लोक डिप्रेशन म्हणजेच नैराश्याचा सामना करत आहेत. ऑफिसमधील कामाचा ताण, घरगुती समस्या, एकटेपणा यामुळे मानसिक तणाव वाढत चालला आहे. त्यामुळे अनेकजण डिप्रेशन कमी करण्यासाठी औषधे घेत आहेत. मात्र, ही औषधे हृदयासाठी किती धोकादायक ठरू शकतात, हे अनेकांना माहिती नाही.

advertisement
2/5
 नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून असा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे की, डिप्रेशनसाठी वापरली जाणारी काही औषधे, विशेषतः ऍण्टीडिप्रेशंट्स, हृदयविकाराचा धोका वाढवू शकतात. या औषधांमुळे अचानक हृदय थांबण्याचा (Sudden Cardiac Arrest) धोका वाढतो, असं संशोधनात आढळून आलं आहे.

3/5
 या अभ्यासात हजारो रुग्णांचे डेटा तपासण्यात आले. त्यात SSRI (Selective Serotonin Reuptake Inhibitors) आणि TCA (Tricyclic Antidepressants) प्रकारातील औषधे घेणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका इतरांपेक्षा अधिक असल्याचं दिसून आलं. या औषधांचा साइड इफेक्ट थेट हृदयाच्या इलेक्ट्रिकल सिस्टीमवर होतो आणि त्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होण्याचा (arrhythmia) धोका निर्माण होतो.

4/5
 या संदर्भात हृदयारोग तज्ज्ञ डॉ. अनुपम शैकिया म्हणाले की, मानसिक आरोग्य व्यवस्थापनासाठी ही औषधे गरजेची असली, तरी ज्यांना आधीपासून हृदयाचे विकार आहेत त्यांनी ही औषधे घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. जे लोक दीर्घकाळापासून ही औषधे घेत आहेत, त्यांनी नियमित हृदयाची तपासणी करून घ्यावी.

5/5
 तज्ज्ञांनी यावर भर दिला की, अचानकपणे औषध घेणं थांबवू नये. त्यामुळे शरीरावर उलट परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेऊनच पुढील उपचार करावेत. यासोबतच, अधिक सुरक्षित आणि पर्यायी औषधांवर संशोधन सुरू आहे. म्हणून, डिप्रेशनच्या औषधांचा वापर करत असाल, तर हृदयाच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. काळजीपूर्वक आणि वैद्यकीय मार्गदर्शनाखालीच औषधांचा वापर करा.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement