Beer Drinking : थंडीत कोणती बियर पिणं योग्य? एका वेळेला किती पिणं सुरक्षित? न्यू इयरपूर्वी जाणून घ्या सर्वकाही

Last Updated:
Beer Drinking Tips : नववर्षाची पार्टी म्हणजे मजा, संगीत आणि थोडासा चिल मूड.. अशा वेळी अनेक जण बिअरचा आनंद घेतात, पण ती योग्य प्रमाणात आणि शरीराला नुकसान न होईल अशा पद्धतीने घेणे खूप महत्त्वाचे असते. योग्य माहिती नसल्यास बिअर वजन वाढवू शकते, झोप बिघडवू शकते किंवा लिव्हरवर ताण आणू शकते. म्हणूनच पार्टीपूर्वी काही हेल्दी टिप्स जाणून घेणे फायदेशीर ठरते.
1/9
पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे बिअर किती प्रमाणात पिणे सुरक्षित आहे हे समजून घेणे. जर तुमची तब्येत चांगली असेल आणि कोणतीही वैद्यकीय समस्या नसेल, तर महिन्यात 2 ते 4 वेळा मर्यादित प्रमाणात बिअर पिणे ठीक मानले जाते. हेल्थ गाईडलाईन्सनुसार पुरुषांनी एका दिवसात जास्तीत जास्त 650ml म्हणजेच सुमारे 2 ग्लासपेक्षा जास्त बिअर पिऊ नये, तर महिलांसाठी 330ml म्हणजे सुमारे 1 ग्लासपेक्षा जास्त बियर पिऊ नये.

advertisement
2/9
रोज बिअर पिणे मात्र आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशाने वजन जलद वाढते, लिव्हरवर भार पडतो आणि झोपेची गुणवत्ता खराब होते. त्यामुळे नियमित बिअर पिण्याची सवय टाळणे सर्वात चांगले.

3/9
कधी कधी बिअर घेत असाल, तर कोणती बिअर हेल्दी आहे हे पाहा. लाइट आणि लो-कॅलरी बिअर शरीरासाठी तुलनेने चांगल्या मानल्या जातात. यात अल्कोहोलचे प्रमाण कमी असते आणि त्या सहज पचतात. लाइट बिअर, व्हीट बिअर, लो-कार्ब बिअर किंवा हलक्या क्राफ्ट बिअरचा पर्याय उच्च-अल्कोहोल किंवा गडद बिअरपेक्षा जास्त सुरक्षित आहे.

4/9
बिअर कोणत्या ऋतूत प्यावी हा प्रश्नही अनेकांना पडतो. बिअर कोणत्याही हंगामात पिऊ शकता, पण उन्हाळ्यात थंड बिअर जास्त फ्रेशनेस देते. हिवाळ्यात मात्र काही बिअर रूम टेम्परेचरवर किंवा हलक्या कोमट तापमानावर घेतल्यास त्यांचा खरा स्वाद जाणवतो. हिवाळ्यात खूप जास्त थंड बिअर पिणे टाळावे.

5/9
अनेकांना जाणून घ्यायचे असते की, बिअरची नशा किती काळ टिकते. साधारणतः बिअरची नशा 2 ते 4 तास टिकते. पण हे प्रमाण व्यक्तीने किती बिअर घेतली आहे, शरीराचे वजन, मेटाबॉलिझम, रिकाम्या पोटी घेतली आहे का, तसेच अल्कोहोल टॉलरन्स लेवलवर अवलंबून असते.

6/9
बिअर प्यायल्यानंतर शरीराला नशेतून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी सुमारे 2 ते 5 तास लागू शकतात. हा वेळ व्यक्तिनुसार बदलतो, कारण प्रत्येक व्यक्तीचा लिव्हर अल्कोहोल वेगवेगळ्या गतीने प्रोसेस करतो.

7/9
बिअर कधी पिऊ नये हे जाणून घेणे देखील तितकेच आवश्यक आहे. प्रेग्नन्सी आणि ब्रेस्टफीडिंगच्या काळात, लिव्हर-किडनी-हृदयाच्या आजारांमध्ये, रिकाम्या पोटी, औषध घेत असताना, ड्रायव्हिंग किंवा मशीन ऑपरेट करण्यापूर्वी बिअर घेणे टाळावे. तसेच मानसिक ताण, चिंता किंवा भावनिक कमजोरी असताना बिअर पिणे अजिबात योग्य नाही.

8/9
नववर्षाच्या पार्टीचा आनंद आरोग्य सांभाळून घ्यायचा असेल, तर बिअर मर्यादित प्रमाणात, योग्य प्रकारची आणि योग्य पद्धतीनेच पिणे आवश्यक आहे. यामुळे तुम्ही पार्टी एन्जॉयही करू शकाल आणि आरोग्यही चांगले राहील.

9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement