Healthy Living : मेकअप नाही पण दररोज काजळ-आयलायनर लावता? मग थांबा डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Last Updated:
तुम्हाला माहीत आहे का दररोज काजळ आणि आयलाइनर लावणं तुमच्या डोळ्यांसाठी धोकादायक ठरू शकतं? सौंदर्य वाढवण्याच्या नादात अनेकदा आपण नकळत डोळ्यांच्या आरोग्याशी खेळ करतो. तुम्ही देखील असं करत असाल तर आधी हे वाचा.
1/7
आजच्या काळात सौंदर्य म्हणजे फक्त मेकअप नाही, तर एक स्टेटमेंट बनलं आहे. अनेक मुली आणि महिला आपल्या डोळ्यांना अधिक आकर्षक दाखवण्यासाठी काजळ आणि आयलाइनरचा वापर करतात. डोळ्यांना उठावदार आणि सुंदर दिसण्यासाठी हे दोन्ही कॉस्मेटिक्स बहुतेकांच्या ब्युटी किटमध्ये कायम असतात. पण तुम्हाला माहीत आहे का दररोज काजळ आणि आयलाइनर लावणं तुमच्या डोळ्यांसाठी धोकादायक ठरू शकतं? सौंदर्य वाढवण्याच्या नादात अनेकदा आपण नकळत डोळ्यांच्या आरोग्याशी खेळ करतो. तुम्ही देखील असं करत असाल तर आधी हे वाचा.

advertisement
2/7
त्वचा तज्ज्ञ डॉ. आरुषी सूरी यांनी आपल्या इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये याच विषयावर महत्त्वाची माहिती दिली आहे. त्या सांगतात की, जरी आपण रोज मेकअप करत नसलो, तरी फक्त काजळ आणि आयलाइनरचा दररोज वापर सुद्धा डोळ्यांसाठी धोकादायक ठरू शकतो.

3/7
या दोन्ही प्रॉडक्ट्सचा थेट संपर्क डोळ्यांशी येतो. जर एक्सपायर्ड प्रॉडक्ट्स वापरले किंवा डोळे नीट स्वच्छ केले नाही, तर बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो. त्यामुळे डोळ्यांत खाज, जळजळ, पाणी येणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

4/7
काजळ आणि आयलाइनरमधील केमिकल्सचे दुष्परिणामकाजळ आणि आयलाइनरमध्ये असणारे केमिकल्स डोळ्यांच्या नाजूक त्वचेसाठी हानिकारक असतात. त्यांचा दररोज वापर केल्याने
डोळ्यांमध्ये सूज, खाज, एलर्जी निर्माण होऊ शकते
हे पदार्थ कॉर्नियावर जमा होऊन दृष्टीवर परिणाम करू शकतात
आयलॅश फॉलिकल्समध्ये इन्फेक्शन होऊन पापण्या गळण्याची शक्यता वाढते
काजळ आणि आयलाइनरमधील केमिकल्सचे दुष्परिणामकाजळ आणि आयलाइनरमध्ये असणारे केमिकल्स डोळ्यांच्या नाजूक त्वचेसाठी हानिकारक असतात. त्यांचा दररोज वापर केल्यानेडोळ्यांमध्ये सूज, खाज, एलर्जी निर्माण होऊ शकतेहे पदार्थ कॉर्नियावर जमा होऊन दृष्टीवर परिणाम करू शकतातआयलॅश फॉलिकल्समध्ये इन्फेक्शन होऊन पापण्या गळण्याची शक्यता वाढते
advertisement
5/7
सर्वात मोठी चूक म्हणजे अनेक महिला रात्री डोळे न स्वच्छ करता झोपतात, ज्यामुळे आयलाइनर आणि काजळचे कण डोळ्यांत राहतात आणि त्यामुळे इन्फेक्शनचा धोका आणखी वाढतो.
सर्वात मोठी चूक म्हणजे अनेक महिला रात्री डोळे न स्वच्छ करता झोपतात, ज्यामुळे आयलाइनर आणि काजळचे कण डोळ्यांत राहतात आणि त्यामुळे इन्फेक्शनचा धोका आणखी वाढतो.
advertisement
6/7
डोळ्यांचं आरोग्य कसं जपावं?स्थानिक किंवा लो-क्वालिटी प्रॉडक्ट्स वापरणं टाळा
शक्य असल्यास लिक्विड आयलाइनरचा वापर करा
मेकअप काढताना फक्त पाण्याने नव्हे तर ऑईल-बेस्ड रिमूव्हरने डोळे स्वच्छ करा
एक्सपायरी डेट नेहमी तपासा आणि प्रॉडक्ट्स शेअर करू नका
कोणतीही खाज किंवा जळजळ वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या
डोळ्यांचं आरोग्य कसं जपावं?स्थानिक किंवा लो-क्वालिटी प्रॉडक्ट्स वापरणं टाळाशक्य असल्यास लिक्विड आयलाइनरचा वापर करामेकअप काढताना फक्त पाण्याने नव्हे तर ऑईल-बेस्ड रिमूव्हरने डोळे स्वच्छ कराएक्सपायरी डेट नेहमी तपासा आणि प्रॉडक्ट्स शेअर करू नकाकोणतीही खाज किंवा जळजळ वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या
advertisement
7/7
डोळे हे आपल्या चेहऱ्याचं सर्वात सुंदर आणि नाजूक अंग आहे. त्यामुळे त्यांची काळजी घेणं जितकं सौंदर्याचं, तितकंच आरोग्याचंही लक्षण आहे. सुंदर दिसण्यापेक्षा सुरक्षित राहणं अधिक महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement