Egg Yolk Facts : अंड्यातील पिवळा बलक खरंच कोलेस्ट्रॉल वाढवतो का? तज्ज्ञांनी सांगितले खावे की नाही..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
अंडी प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे ते बहुतेक लोकांच्या आहाराचा एक प्रमुख भाग आहे. अंड्यामध्ये केवळ प्रथिनेच नाहीत तर इतर अनेक खनिजे देखील असतात, जे आपल्या आरोग्यासाठी एक उत्कृष्ट अन्न आहे. अंड्याचे दोन भाग असतात. पांढरा आणि पिवळा. काही लोकांना असे वाटते की, अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढते आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. पण हे खरंच खरं आहे का? चला जाणून घेऊया.
advertisement
मात्र अनेक तज्ज्ञांनी हे सांगितले आहे की, अंड्यातील पिवळ बलकमध्ये आहारातील कोलेस्ट्रॉल असते आणि त्याचा रक्तावर किरकोळ परिणाम होतो. अनेक संशोधनांमध्ये असेही म्हटले गेले आहे की, एकापेक्षा जास्त अंडे खाल्ले तर त्याचा रक्तातील कोलेस्टेरॉलच्या पातळीवर कोणताही परिणाम होत नाही. अंड्याचा पिवळा भाग अतिशय आरोग्यदायी असून त्यात अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अंड्यातील पिवळ्या भागामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि जास्त चरबी असते, ज्यामुळे तुमचे पोट भरलेले राहते आणि तुम्ही कमी खाता. संपूर्ण अंड्यामध्ये अंड्याच्या पांढऱ्या भागापेक्षा जास्त कॅलरीज असतात. विज्ञानाच्या मते, तुम्ही संपूर्ण अंडी खावीत, अंड्याचा फक्त पांढरा भाग नाही. जर तुम्हाला 4 अंड्यांचा पांढरा भाग खायचा असेल तर त्याऐवजी 2 पूर्ण अंडी खा.