इंजिनिअरिंगला केला रामराम, आता विकतोय पिझ्झा आणि सँडविच, इतकी आहे कमाई!
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
या स्टार्टर्स कॅफेमध्ये पिझ्झा, बर्गरपासून ते अगदी मॅगीपर्यंत सगळे चटपटीत पदार्थ मिळतात. कौस्तुभच्या स्टार्टर्स कॅफेमध्ये पिझ्झा आणि सँडविचचे 10 हून अधिक प्रकार मिळतात.
advertisement
advertisement
कौस्तुभ असे या तरुणाचे नाव असून, कौस्तुभचे शिक्षण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून पूर्ण झालेले आहे. त्याच्या या स्टार्टर्स कॅफेमध्ये पिझ्झा, बर्गरपासून ते अगदी मॅगीपर्यंत सगळे चटपटीत पदार्थ मिळतात. कौस्तुभच्या स्टार्टर्स कॅफेमध्ये पिझ्झा आणि सँडविचचे 10 हून अधिक प्रकार मिळतात. तो यामधून दिवसाला 3 हजाराच्या वरती कमाई करतो.
advertisement
advertisement
हिची किंमत फक्त 79 रुपये असून इथे येणारा प्रत्येक जण आवर्जून ही कोल्ड कॉफी ऑर्डर करतो. जम्बो टॉवर स्नॅक्स हे सुद्धा कौस्तुभची स्पेशालिटी आहे. सध्या इथे अनेक जण स्टार्टर्स कॉम्बो खाण्यासाठी सुद्धा येत आहेत. या स्टार्टर्स कॉम्बोमध्ये तुम्हाला 299 रुपयाला व्हर्जिन मोहितो, क्लासिक मॅगी आणि व्हेज किंवा चिकन बर्गर मिळेल. असे यामध्ये तुम्हाला खूप ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहेत.
advertisement
'कौस्तुभ माझा मोठा भाऊ आहे. तो डेकोरेशन मॅनेजमेंट सुद्धा हे कॅफे सांभाळून करतो. त्यामुळे त्याला जेव्हा कॅफेसाठी वेळ द्यायला जमत नाही तेव्हा मी येते. आमच्या इथे सध्या बेस्ट सेलिंग मध्ये जम्बो टॉवर्स स्नॅक्स हा पदार्थ खूप प्रसिद्ध होत आहे. अनेक जण येऊन हा जम्बो टॉवर स्नॅक्स घेतायेत आणि तो लोकांना खूप आवडतोय सुद्धा' असे सुरभी हिने सांगितले.
advertisement