महाराष्ट्र्रातील या गावाला पेढ्यांचं गाव का म्हणतात? तरुणांनी असं काय केलं? PHOTOS
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
अमरावती मधील पूर्णानगर हे गाव पेढ्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावातील जास्तीत जास्त लोक पेढ्यांचा व्यवसाय करतात. येथील पेढे पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.
advertisement
advertisement
पूर्णानगर येथील पेढा व्यावसायिक अभिजित तिवारी यांच्याशी लोकल 18 ने चर्चा केली. तेव्हा ते सांगतात की, या गावात 25 ते 26 वर्षापासून हा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. शेतीमध्ये उत्पन्न कमी होत असल्याने शेतकऱ्याला नुकसान सहन करावे लागत होतो. त्यामुळे शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन आणि त्याच माध्यमातून हा पेढ्याचा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे.
advertisement
तेव्हा शितल बोबडे यांनी सर्वात पहिले हा व्यवसाय सुर केला. त्यानंतर गावातील अनेक तरुणांनी हा व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले. आता पूर्णानगर बस स्टॉपला पेढ्यांचे 15 ते 16 दुकान आहेत. गावाच्या शेजारी असलेल्या गावातून येथे दूध पुरवल्या जाते. 70 ते 75 रुपये लिटर याप्रमाणे आम्ही दूध खरेदी करतो. प्रत्येक दुकानात वेगवेगळे गवळी दूध आणून देतात. त्यापासून हा पेढा बनवला जातो, असे ते सांगतात.
advertisement
advertisement
advertisement