झणझणीत मिसळ खावी तर कोल्हापूरचीच! 'जगात भारी' टॉप 5 मिसळ
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
Kolhapur Misal: कोल्हापुरात झणझणीत मिसळ मिळणारी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत. यातील टॉप 5 मिसळबाबत जाणून घेऊया.
advertisement
ठोंबरे मिसळ : कोल्हापुरातील बिंदू चौक परिसरात भोई गल्लीतील ठोंबरे मिसळ प्रसिद्ध आहे. ही मिसळ सकाळी 9 ते 12 या वेळेत मिळते. 17 वर्षांपूर्वी चालू झालेल्या या मिसळीला कोल्हापूरकरांसह येणाऱ्या पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. इतकी प्रसिद्धी मिळून सुद्धा ही मिसळ अजूनही साध्या पद्धतीने एका छोट्या दुकान गाळ्यामध्ये चालू आहे. तरीही लोक इथं नंबर लावून मिसळ खात असतात, हीच या मिसळची खासियत आहे.
advertisement
advertisement
लक्ष्मी मिसळ : कोल्हापुरातील उद्यम नगर परिसरात असणारी लक्ष्मी मिसळ प्रसिद्ध आहे. ही मिसळ खाण्यासाठी सेलिब्रिटीही हजेरी लावतात. या मिसळनं देशभरात आयोजित केलेल्या विविध खाद्य महोत्सवामध्ये कोल्हापूरचं नाव गाजवलंय. कोल्हापुरात सध्या मिसळीच्या नावाखाली सोलकढी, पापड, दही, खर्डा असे बरेच प्रकार दिले जातात. मात्र कमी वेळेतच जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवलेली ही मिसळ अगदी साध्या पद्धतीने दिली जाते.
advertisement
advertisement
advertisement