इडली-उडीद वडा व्यवसाय, मेहनतीने केला यशस्वी, माय-लेकराची सर्वांसाठी प्रेरणादायी कहाणी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
मेहनतीने व्यवसाय सांभाळत पाटील माय-लेक आर्थिक उभारी घेत आहेत. नेर्ले गावच्या पाटील माय-लेकराचा संघर्षमय प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरतो आहे.
पतीच्या निधनानंतर खचून न जाता जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर अनिता पाटील यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलानेही स्वतःची जबाबदारी ओळखत आईच्या मदतीने व्यवसाय सुरू केला. मेहनतीने व्यवसाय सांभाळत पाटील माय-लेक आर्थिक उभारी घेत आहेत. नेर्ले गावच्या पाटील माय-लेकराचा संघर्षमय प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरतो आहे.
advertisement
अनिता महादेव पाटील आणि त्यांचा मुलगा प्रतीक हे सांगलीच्या वाळवा तालुक्यातील नेर्ले गावचे रहिवासी आहेत. आठ वर्षांपूर्वी महादेव पाटील यांचे हृदयविकाराने निधन झाले. पतीच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी अनिता यांच्यावर आली. कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी अनिता पाटील यांनी स्वतःच्या एक एकर शेतीसह इतरांच्या शेतात रोजंदारी देखील केली. मुलीचे आणि मुलाचे शिक्षण, मुलीचे लग्न या जबाबदाऱ्या देखील पार पाडला.
advertisement
अनिता यांच्याकडे स्वतःची एक एकर शेती असल्याने त्यांना उदरनिर्वाहासाठी इतरांच्या शेतामध्ये मजुरी करावी लागली. मुलीला बारावीपर्यंतचे शिक्षण देऊन मुलीचे लग्न केले. मुलास बारावीनंतर आयटीआयचे व्यावसायिक प्रशिक्षण दिले. यासह त्याने ग्रॅज्युएशन देखील पूर्ण केले. हा प्रवास तितका सोपा नव्हता. परंतु खचून न जाता येणाऱ्या परिस्थितीस धाडसाने तोंड देत त्यांनी दिवस काढले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement