नोकरी सोडून बनवला मसाला ब्रँड, परदेशातही दरवळतोय सुगंध, 55 लाखापर्यंत उलाढाल करणाऱ्या रसिकाची कहाणी

Last Updated:
मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी आपल्या उत्पादनांना मोठी मागणी निर्माण केली आहे. यामधून त्यांना वर्षाकाठी 55 लाखापर्यंत उलाढाल होत आहे.
1/7
स्वयंपाकघरातील जेवणाला खास बनवणाऱ्या भारतीय मसाल्यांचा सुगंध आता परदेशातही दरवळतोय. एका मराठी उद्योजकेने नोकरीसोडून सुरू केलेला मसाल्याचा व्यवसाय आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे.

advertisement
2/7
 मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी आपल्या उत्पादनांना मोठी मागणी निर्माण केली आहे. यामधून त्यांना वर्षाकाठी 55 लाखापर्यंत उलाढाल होत आहे.
मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी आपल्या उत्पादनांना मोठी मागणी निर्माण केली आहे. यामधून त्यांना वर्षाकाठी 55 लाखापर्यंत उलाढाल होत आहे.
advertisement
3/7
पुण्यातील कुडजे इथे राहणारे रसिका पायगुडे आणि मंगेश पायगुडे हे दोघेही इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात काम करत होते. परंतु कोरोना काळात सगळं काही बंद झाल्यामुळे आपण काहीतरी करावं यासाठी त्यांनी नोकरीसोडून खादी ग्रामोद्योग अंतर्गत प्रशिक्षण घेऊन अदित हा ब्रँड तयार केला. 2020 मध्ये या त्यांनी व्यवसायाची सुरुवात केली.

4/7
कोरोना काळात नोकरीसोडून व्यवसाय करण्याचं ठरवलं. समाजासाठी आपण काही करू शकतो का या उद्देशाने पुढे विविध प्रकारचे मसाले तयार करण्याचे ठरवलं. मग सुरुवातीला युट्यूबवर पाहून काही मसाले तयार केले. परंतु अजून मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर योग्य प्रकारे प्रशिक्षण घेऊन यामध्ये उतरलं पाहिजे. यासाठी खादी ग्रामोद्योगमध्ये 35 मसाले तयार करण्याचं प्रशिक्षण घेऊन सुरुवात केली, असं रसिका पायगुडे सांगतात.

5/7
विविध प्रदर्शनांमधून विक्री होत असल्याने पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, इंदूर या शहरांतील महिला ग्राहक कायमच्या जोडल्या गेल्या आहेत. काही कुटुंब परदेशात वास्तव्यास असली तरी पुण्यात आल्यावर मसाले खरेदी करतात. तसेच कुरिअरद्वारे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, कॅनडा, न्यूझीलंड या देशात हळद पावडर, मिरची पावडर, विविध मसाले विक्री करतात.

6/7
हा व्यवसाय करण्यासाठी कुटुंबाचे देखील मोठे पाठबळ हे लाभले आहे. त्यामुळेच आज हा प्रवास शक्य झाला आहे. मसाल्यामध्ये 32 प्रकारचे मसाले आणि चार प्रकारच्या चटणी आहेत. यामध्ये चिकन मसाला, बिर्याणी मसाला, मालवणी, कोल्हापुरी, फिश करी, फिश फ्राय, गोडा मसाला, कोकणी मसाला असे विविध प्रकारचे मसाले तयार केले जातात.

7/7
आता जवळपास 8 महिला या कामाला आहेत. या व्यवसायाच्या माध्यमातून वर्षाला 55 लाखापर्यंत उलाढाल ही होते, अशी माहिती व्यावसायिका रसिका पायगुडे यांनी दिली आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement