उन्हाळ्यात शरीराला फायदेशीर मठ्ठा, फक्त 15 रुपयांत घ्या आस्वाद, सोलापुरातील हे फेमस ठिकाण माहितीये का?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
30 वर्षांपासून शिवा भास्कर हे मठ्ठा विकतात. सिद्धेश्वर पेठ जिल्हा परिषदेच्या आवारात जिल्ह्यातून येणारे सर्वच व्यक्ती त्यांचा मठ्ठा पिल्याशिवाय जात नाहीत.
advertisement
advertisement
शिवा भास्कर जाधव गेल्या 30 वर्षांपासून मठ्ठा विक्रीचा व्यवसाय करत आहे. हा मठ्ठा स्वतः बनवत आहे. जानेवारी पासून सुरू झालेले मठ्ठा विक्री ही 7 जूनला थांबते. दिवसाला शिवा भास्कर यांच्याकडे दिवसाला 5 ते 10 कॅन मठ्ठा हा उन्हाळ्याच्या सीझनमध्ये विकला जातो. क्वालिटीमध्ये कोणतीही आजपर्यंत तफावत केली नाही त्यामुळेच मी या धंद्यात टिकून आहे, असं शिवा भास्कर सांगतात.
advertisement
advertisement
पूर्वी 8 आण्यांना किंमत असणाऱ्या मठ्ठ्याची आज 15 रुपये इतकी किंमत आहे. अत्यंत उत्तम क्वालिटीचा हा मठ्ठा शहरात सर्वच नागरिकांना भुरळ घालतो. यामध्येची स्पेशॅलिटी म्हणजे इतर मठ्ठ्यावाल्यांपेक्षा शिवा हे स्वतः दूध आणून ते दूध फोडतात आणि तयार झालेल्या दह्यापासून ते लसूण, अद्रक, पुदिना आणि काळे मीठ घालून स्वतः तयार करतात.
advertisement
advertisement