Fruits vs Vegetables : फळं की भाज्या आरोग्यासाठी जास्त काय चांगलं? 99 टक्के लोकांचा चुकीचा समज
- Published by:Devika Shinde
Last Updated:
फळं आणि भाज्या दोन्हीही आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या आहेत, पण अनेकदा मनात प्रश्न येतो की “फळं जास्त फायदेशीर का भाज्या?” चला तर मग, या दोन्हींच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया.
advertisement
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण फास्ट फूड, पॅकेज्ड स्नॅक्स आणि जंक फूडकडे जास्त झुकतो, पण खरी ताकद आणि पोषण आपल्याला निसर्गातूनच मिळतं. म्हणजेच फळं आणि भाज्यांमधून. दोन्हीही आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या आहेत, पण अनेकदा मनात प्रश्न येतो की “फळं जास्त फायदेशीर का भाज्या?” चला तर मग, या दोन्हींच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया.
advertisement
हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, फळं आणि भाज्यांमध्ये विटामिन्स, मिनरल्स आणि फायबरचं प्रमाण मुबलक असतं. फळांमध्ये नैसर्गिक साखर (नेचरल शुगर) असते, जी शरीराला झटपट ऊर्जा देते. तर भाज्यांमध्ये साखरेचं प्रमाण कमी असतं आणि त्यात फायबर, आयर्न, कॅल्शियम आणि अँटिऑक्सिडंट्सचं प्रमाण अधिक असतं. हे घटक दीर्घकाळासाठी शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतात.
advertisement
advertisement
दुसरीकडे, हिरव्या पालेभाज्या जसे की मेथी, पालक, ब्रोकली, फुलकोबी आणि बीन्स या शरीरासाठी डिटॉक्स एजंटचं काम करतात. या भाज्या वजन नियंत्रणात ठेवायला, बद्धकोष्ठता कमी करायला आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकायला मदत करतात. शिवाय, भाज्यांमधील कमी कॅलरीमुळे त्या वजन कमी करण्यासाठीही उत्तम पर्याय ठरतात. नियमितपणे भाज्या खाल्ल्याने हृदयरोग, कर्करोग आणि उच्च रक्तदाबासारख्या आजारांपासूनही संरक्षण मिळतं. दररोज किमान 3 ते 5 वाट्या भाज्या खाण्याची सवय ठेवावी, असं तज्ज्ञांचं मत आहे.
advertisement
advertisement
advertisement