Hair Care Tips : केसगळतीने त्रस्त आहात? उष्ण हवामानात हेअर केअरसाठी फॉलो करा 'या' टिप्स..

Last Updated:
Seasonal Hair Care Tips For Summer To Fall Transition : आजकाल केस गळणे ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी जवळपास प्रत्येक दुसरी व्यक्ती अनुभवते. मात्र यावर काही सोपे घरगुती उपाय आहेत, जे तुमचे केस निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.
1/7
तणाव, हार्मोनल बदल किंवा इतर अनेक कारणांमुळे केस गळतात. या समस्येवर आपण अनेक उपाय करतो. पण कधीकधी अपेक्षित परिणाम मिळत नाही. विशेषतः उष्ण हवामानामध्ये घामाने चिकटलेले केस, धूळ आणि कोंड्यामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते. आज आपण यावर काही सोपे उपाय पाहणार आहोत.

advertisement
2/7
खोबरेल तेल आणि कढीपत्ता : एका भांड्यात 200 मिली खोबरेल तेल घ्या आणि त्यात 4 ते 5 कढीपत्ता टाका. कढीपत्ता काळा होईपर्यंत शिजवा. नंतर गॅस बंद करा आणि तेल थंड होऊ द्या. हे मिश्रण एका काचेच्या बरणीत भरून ठेवा आणि आठवड्यातून दोनदा याचा वापर करा.

3/7
कांद्याचा रस : कांदा मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा रस गाळून घ्या. हा रस टाळूवर लावा आणि 40 मिनिटे ठेवा. त्यानंतर केस शॅम्पूने धुवा. हा उपाय आठवड्यातून 1-2 वेळा केल्यास फायदा होईल.

4/7
अंड्याच्या बलकाचा मास्क : एका भांड्यात अंड्याचा बलक चांगला फेटून घ्या. हा बलक टाळूवर लावा आणि कमीत कमी 30 मिनिटे ठेवा. त्यानंतर केस शॅम्पूने धुवा.

5/7
आवळ्याचा रस : ताजा आवळ्याचा रस टाळूवर लावा. 30 मिनिटांनी सौम्य शॅम्पू आणि कंडिशनरने केस धुवा. आवळ्याचा रसही तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर असतो.

6/7
ग्रीन टी : 2 ते 3 ग्रीन टी बॅग एका भांड्यात गरम पाण्यात ठेवा. मिश्रण तयार झाल्यावर ते थोडे थंड होऊ द्या. हा चहा टाळूवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा.

7/7
मेथी : अर्धा कप मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते बारीक करून त्याची पेस्ट बनवा आणि केसांवर हेअर मास्क म्हणून लावा. 30 मिनिटांनी पाण्याने केस धुवा.

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement