IND vs PAK : पाकिस्तानची AK-47 निघाली चायनाची... दोन तासात माज उतरवला, टीम इंडियाचा दणदणीत विजय

Last Updated:

आशिया कपमध्ये टीम इंडियाने पुन्हा एकदा पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. पाकिस्तानने दिलेलं 172 रनचं आव्हान टीम इंडियाने 18.5 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पार केलं.

पाकिस्तानची AK-47 निघाली चायनाची... दोन तासात माज उतरवला, टीम इंडियाचा दणदणीत विजय
पाकिस्तानची AK-47 निघाली चायनाची... दोन तासात माज उतरवला, टीम इंडियाचा दणदणीत विजय
दुबई : आशिया कपमध्ये टीम इंडियाने पुन्हा एकदा पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. पाकिस्तानने दिलेलं 172 रनचं आव्हान टीम इंडियाने 18.5 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पार केलं. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल हे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. अभिषेक शर्माने 39 बॉलमध्ये 74 रन केले. 189.74 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत अभिषेकने 6 फोर आणि 5 सिक्स लगावल्या. तर शुभमन गिलने 167.86 च्या स्ट्राईक रेटने 28 बॉलमध्ये 47 रन केले. गिलने त्याच्या खेळीमध्ये 8 तडाखेबंद फोर मारल्या. तिलक वर्माने 19 बॉलमध्ये नाबाद 30 आणि हार्दिक पांड्याने नाबाद 7 रन केले.
गिल आणि अभिषेक यांच्यात 9.5 ओव्हरमध्येच 105 रनची पार्टनरशीप झाली. या दोघांच्या पार्टनरशीपनंतर मात्र टीम इंडियाच्या बॅटिंगला थोडा संघर्ष करावा लागला. सूर्यकुमार यादव 0 रनवर तर संजू सॅमसन 17 बॉलमध्ये 13 रन करून आऊट झाला. पाकिस्तानकडून हारिस राऊफला 2, अबरार अहमद-फहीम अश्रफला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताने पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 171/5 वर रोखलं. पाकिस्तानकडून साहिबझादा फरहानने 45 बॉलमध्ये 58 रन केले. तर फहीम अश्रफने 8 बॉलमध्ये नाबाद 21 रन करून पाकिस्तानला 170 च्या पुढे नेलं. भारताकडून शिवम दुबेला 2 विकेट मिळाल्या, याशिवाय कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्याला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
advertisement

टीम इंडिया फायनलजवळ

पाकिस्तानविरुद्धच्या या विजयासोबतच टीम इंडिया आशिया कपच्या फायनलच्या जवळ पोहोचली आहे. भारताचे उरलेले सामने बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध आहेत. यापैकी एका सामन्यात विजय झाला तरीही भारतीय टीम फायनलमध्ये पोहोचेल.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : पाकिस्तानची AK-47 निघाली चायनाची... दोन तासात माज उतरवला, टीम इंडियाचा दणदणीत विजय
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement