IND vs AUS : वैभव सूर्यवंशीचा आता ऑस्ट्रेलियाला तडाखा, फक्त 22 बॉलमध्येच खेळ खल्लास!

Last Updated:

वैभव सूर्यवंशी हा भारताच्या अंडर-19 टीमसोबत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. पहिल्या युथ वनडेमध्ये वैभव सूर्यवंशीने भारताला धमाकेदार सुरूवात करून दिली.

वैभव सूर्यवंशीचा आता ऑस्ट्रेलियाला तडाखा, फक्त 22 बॉलमध्येच खेळ खल्लास!
वैभव सूर्यवंशीचा आता ऑस्ट्रेलियाला तडाखा, फक्त 22 बॉलमध्येच खेळ खल्लास!
मुंबई : वैभव सूर्यवंशी हा भारताच्या अंडर-19 टीमसोबत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. पहिल्या युथ वनडेमध्ये वैभव सूर्यवंशीने भारताला धमाकेदार सुरूवात करून दिली. वैभव सूर्यवंशीने 22 बॉलमध्ये 38 रनची आक्रमक खेळी केली. या इनिंगमध्ये वैभवने 7 फोर आणि एक सिक्स मारला. वैभवच्या या खेळीमुळे भारताने 5 ओव्हरमध्येच 50 रन केले. तसंच ऑस्ट्रेलिया ए ने दिलेल्या 226 रनच्या आव्हानाचा पाठलाग भारताने 117 बॉल शिल्लक असतानाच केला आणि ही मॅच 7 विकेटने जिंकली.
वैभव सूर्यवंशी मागच्या काही महिन्यांपासून उत्कृष्ट कामगिरी करत आहे. पहिले आयपीएल 2025 आणि त्यानंतर अंडर-19 मध्ये खेळताना वैभव वादळी बॅटिंग करत आहे. वैभव सूर्यवंशीचा हा पहिलाच ऑस्ट्रेलिया दौरा आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात त्याने बॅट चालवायला सुरूवात केली आहे. याआधी इंग्लंड दौऱ्यात भारताच्या अंडर-19 टीमकडून खेळताना वैभवने 71 च्या सरासरीने 355 रन केले होते. इंग्लंड दौऱ्यात वैभव सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. यानंतर युथ टेस्टच्या 4 इनिंगमध्ये त्याला 90 रन करता आले होते.
advertisement

वैभवचं आयपीएलमध्ये वादळ

वैभव सूर्यवंशी 14व्या वर्षी आयपीएल खेळणारा सगळ्यात लहान वयाचा खेळाडू ठरला. राजस्थान रॉयल्सने वैभवला आयपीएल लिलावात विकत घेतलं होतं. वैभवने आयपीएल 2025 मध्ये 7 सामन्यांमध्ये 206.55 चा स्ट्राईक रेट आणि 36 च्या सरासरीने 252 रन केले होते, यात त्याने एक शतकही झळकावलं होतं.

इंडिया ए किती मॅच खेळणार?

advertisement
ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये इंडिया ए 3 वनडे आणि 2 युथ टेस्ट खेळणार आहे. 2026 च्या सुरूवातीला होणाऱ्या अंडर-19 वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने ही सीरिज महत्त्वाची आहे. वैभव सूर्यवंशी अंडर-19 वर्ल्ड कप खेळेल, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्याआधी वैभव सूर्यवंशीने जास्तीत जास्त अनुभव घ्यावा, हे टीम इंडियासाठी महत्त्वाचं असेल.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : वैभव सूर्यवंशीचा आता ऑस्ट्रेलियाला तडाखा, फक्त 22 बॉलमध्येच खेळ खल्लास!
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement