VIDEO : चीते की चाल,बाज की नजर, और सूर्या पे संदेह नही करते,खतरनाक Run Out, पाकिस्तानी खेळाडूचा माजच उतरला

Last Updated:

टीम इंडियाचा कर्णधार सुर्यकुमार यादवने खतरनाक रनआऊट घेतला आहे. या रनआऊटनंतर पाकिस्तानी खेळाडू तोंडावर आपटला आहे.त्यामुळेच चीते की चाल,बाज की नजर, और सूर्यकुमार यादव पे संदेह नही करते.

surykumar Yadav run out mohammmad Nawaz
surykumar Yadav run out mohammmad Nawaz
IND vs PAK Asia Cup 2025 : सूपर 4 मध्ये सुरु असलेल्या हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 171
धावा ठोकल्या आहेत. पाकिस्तानचा हा प्रथम फलंदाजी करताना भारताविरूद्ध सर्वाधिक स्कोर आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर 172 धावांचे लक्ष्य आहे.या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सुर्यकुमार यादवने खतरनाक रनआऊट घेतला आहे. या रनआऊटनंतर पाकिस्तानी खेळाडू तोंडावर आपटला आहे.त्यामुळेच चीते की चाल,बाज की नजर, और सूर्यकुमार यादव पे संदेह नही करते.
जसप्रीत बुमराहच्या 19 व्या ओव्हर दरम्यान ही घटना घडली आहे. बुमराहने ओव्हरचा तिसरा बॉल सलमान आघाला टाकला होता.या बॉलवर खेळाडूंनी एक धाव काढली.त्यानंतर पहिल्यांदा स्ट्राईक एंडवर बॉल मारला गेला.पण खेळाडू पोहोचला होता.तर नॉन स्ट्राईक रेटवर असलेला खेळाडू क्रिजवर जायला आळस काढत होता. अवघ्या काही सेकंदात या घडामोडी घडत होत्या. त्यामुळे सूर्याने दुरूनच ही गोष्ट हेरून नॉन स्ट्राईक एंडवर ब़ॉल थ्रो केला आणि बॉल बरोबर जाऊन विकेटला लागला. इथपर्यंत नवाज क्रिजपर्यंत पोहोचलाच नव्हता.त्यामुळे टीम इंडियाचा रन आऊटच्या रूपात मस्त विकेट मिळाली.यामुळे नवाज 21 धावांवर आऊट झाला.अशा विचित्र पद्धतीने आऊट झाल्यानंतर नवाज देखील निराश झाला होता. पण या दरम्यान सूर्याच्यी तीक्ष्ण नजरेच प्रचंड कौतुक झाले.
advertisement

टीम इंडियासमोर 172 धावांचे लक्ष्य

पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने उत्कृष्ट फलंदाजी केली आहे.त्याने 58 धावांची अर्धशतकीय खेळी केली आहे.या खेळीत त्याने 3 गगनचुंबी षटकार आणि 5 खणखणीत चौकार लगावले आहेत. या व्यतिरीक्त शेवटच्या क्षणी फहीमने 8 बॉलमध्ये 20 धावा काढल्या आहेत.त्यामुळे या बळावर पाकिस्तानने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 171 धावा केल्या आहेत.त्यामुळे टीम इंडियासमोर 172 धावांचे लक्ष्य आहे.भारताकडून शिवम दुबेने 2 तर हार्दीक पांड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली आहे.
advertisement
भारताची प्लेइंग इलेव्हन :
सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रित बुमरा,
पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन :
सैम अयुब, साहिबजादा फरहान, फखर जमान, सलमान आघा (कॅप्टन), हुसैन तलत, मोहम्मद हारिस (डब्ल्यू), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ, अबरार अहमद
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : चीते की चाल,बाज की नजर, और सूर्या पे संदेह नही करते,खतरनाक Run Out, पाकिस्तानी खेळाडूचा माजच उतरला
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement