advertisement

Western Railway Job : 10वी, 12वी अन् ITI उत्तीर्ण मुलांना नोकरीची सुवर्णसंधी, पश्चिम रेल्वेमध्ये भरती; मिळणार 60000 पगार

Last Updated:

Western Railway Scout and Guide Bharti 2025 : पश्चिम रेल्वेने तरूण- तरूणींसाठी नोकरीची संधी आणली आहे. जे युवक- युवती सरकारी नोकरीच्या संधीमध्ये आहेत. त्यांच्यासाठी ही फार मोठी संधी आली आहे. 10वी, 12वी आणि आयटीआय उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पश्चिम रेल्वेकडून नोकर भरती जाहीर करण्यात आली आहे.

दिवाळी आणि नवरात्रीसाठी विशेष गाड्या
दिवाळी आणि नवरात्रीसाठी विशेष गाड्या
पश्चिम रेल्वेने तरूण- तरूणींसाठी नोकरीची संधी आणली आहे. जे युवक- युवती सरकारी नोकरीच्या संधीमध्ये आहेत. त्यांच्यासाठी ही फार मोठी संधी आली आहे. 10वी, 12वी आणि आयटीआय उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पश्चिम रेल्वेकडून नोकर भरती जाहीर करण्यात आली आहे. अर्जप्रक्रियेला सुरूवात झाली असून इच्छूक उमेदवारांनी अर्ज लवकरात लवकर भरावा. ऑनलाईन अर्जप्रक्रिया घरामध्ये बसून अगदी सोप्या पद्धतीने आणि आरामात उमेदवार हा अर्ज भरू शकणार आहेत.
ज्या युवक आणि युवतींना पश्चिम रेल्वेमध्ये नोकरीची संधी हवी आहे, त्यांनी https://rrc-wr.com/ या वेबसाईटला जाऊन आपला अर्ज भरायचा आहे. पण अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी https://rrc-wr.com/rrwc/Files/2632.pdf या वेबसाईटला जाऊन शैक्षणिक पात्रता, अर्जाची शेवटची तारीख, अर्ज शुल्क यासह अधिक माहिती जाणून घ्या. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अद्याप सुरूवात झालेली नाही. येत्या 24 सप्टेंबरपासून संध्याकाळी 6 वाजल्यापासून अर्ज भरण्यासाठी सुरूवात होणार आहे. तर, ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर आहे. त्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उमेदवार अर्ज भरू शकणार आहेत.
advertisement
स्काउट अँड गाईड (Level 1) आणि स्काउट अँड गाईड (Level 2) अशा दोन पदांसाठी पश्चिम रेल्वे ही भरती करीत आहेत. स्काउट अँड गाईड (Level 1) साठी 12 पदांसाठी तर, स्काउट अँड गाईड (Level 2) साठी 2 पदांसाठी भरती केली जाणार आहे. अनुक्रमे पहिल्या पदसाठी अर्जदार 10वी किंवा ITI उत्तीर्ण हवा अशी शैक्षणिक पात्रता आहे. स्काउट अँड गाईड (Level 2) साठी 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण हवी अशी शैक्षणिक पात्रता हवी आहे. शिवाय इतर पात्रताही पश्चिम रेल्वेने उमेदवारांना दिल्या आहेत. कोणत्याही विभागात स्काउट/ गाईड/ रोव्हर/ रेंजर किंवा हिमालयन वुड बॅज (HWB) उमेदवार अध्यक्ष असावा.
advertisement
शिवाय, गेल्या 5 वर्षांपासून म्हणजेच 2020- 21 पासून स्काउट्स संघटनेचा सक्रिय सदस्य असावा. “सक्रियतेचे प्रमाणपत्र” परिशिष्ट ‘अ’ नुसार असले पाहिजे सोबत जोडलेले असावे. राष्ट्रीय स्तरावरील किंवा अखिल भारतीय रेल्वे स्तरावरील दोन कार्यक्रम आणि राज्य स्तरावरील दोन कार्यक्रमांमध्ये त्याने सहभाग नोंदवलेला असावा. पहिल्या पदासाठी 18 ते 33 वयापर्यंत वयाची अट आहे. तर दुसर्‍या पदासाठी 18 ते 30 पर्यंतची वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील उमेदवारांना 5 वर्षांपर्यंत वयाची सुट देण्यात आली आहे. तर, इतर मागासवर्गीय वर्गातील उमेदवारांना 3 वर्षांपर्यंत वयाची सुट दिली आहे.
advertisement
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असून अर्ज शुल्क भरण्याची प्रक्रियाही ऑनलाईन असून शेवटची तारीखही एकच आहे. अर्ज शुल्क भरल्यानंतरच उमेदवारांचा अर्ज ग्राह्य धरला जाईल. दरम्यान, खुले प्रवर्ग, इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक असणाऱ्या उमेदवारांना अर्जाचे शुल्क 500 रूपये भरायचे आहे. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग आणि महिलांना 250 रूपये फी भरायची आहे. अजून अर्ज भरण्यासाठी सुरूवात झाली नसून अर्ज भरण्यास सुरूवात होताच इच्छूकांनी अर्ज भरावा. अर्ज भरण्यापूर्वी नोकरीसंबंधितची जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Western Railway Job : 10वी, 12वी अन् ITI उत्तीर्ण मुलांना नोकरीची सुवर्णसंधी, पश्चिम रेल्वेमध्ये भरती; मिळणार 60000 पगार
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement