कुछ तो गडबड हैं! अमाल मलिकने गायलं रोमँटिक गाणं, लाजून लाल झाली तान्या मित्तल, VIDEO VIRAL
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bigg Boss 19 : प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अमाल मलिक आणि अभिनेत्री तान्या मित्तल यांच्यातील नातं मैत्रीपेक्षाही पुढे जात असल्याचं दिसत आहे.
मुंबई : ‘बिग बॉस १९’ च्या घरात आता रोज नवीन नवीन गोष्टी घडत आहेत. कधी भांडणं तर कधी नव्या दोस्ती सुरू आहेत. पण, सध्या ज्या एका नात्याची चर्चा सर्वात जास्त आहे, ते म्हणजे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अमाल मलिक आणि अभिनेत्री तान्या मित्तल यांचं. त्यांच्यातील नातं मैत्रीपेक्षाही पुढे जात असल्याचं दिसत आहे.
नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये ‘बिग बॉस ओटीटी १’ ची स्पर्धक उर्फी जावेदने ‘बिग बॉस १९’ च्या घरात एंट्री घेतली. तिने स्पर्धकांना एक खूपच मजेदार टास्क दिला. या टास्कमध्ये प्रत्येकाने अशा एका स्पर्धकाचं हृदय तोडायचं होतं, ज्यांच्यात खूप घट्ट मैत्री आहे.
या टास्कदरम्यान, अमाल मलिक आणि तान्या मित्तल यांच्यातली केमिस्ट्री सगळ्यांना दिसली. टास्कदरम्यान, अमालने तान्यासाठी एक रोमँटिक गाणं गायलं. अमालने त्याच्याच भावाने, अरमान मलिकने गायलेलं ‘हुआ है आज पहली बार’ हे गाणं गायलं, ज्यामुळे तान्या लाजली आणि घरातील इतर स्पर्धकांनीही हे पाहिलं.
advertisement
advertisement
एलिमिनेशनमध्ये ट्विस्ट!
या आठवड्यात घरातून बाहेर जाण्यासाठी अभिषेक बजाज, अश्नूर कौर, नेहा चुडासमा, बशीर अली आणि प्रणित मोरे यांना नॉमिनेट करण्यात आलं आहे. शोच्या सूत्रानुसार, नेहा चुडासमा घराबाहेर जाईल, पण यात एक ट्विस्ट आहे. ती घरातून पूर्णपणे बाहेर जाणार नाही, तर ती एका ‘सिक्रेट रूम’मध्ये जाणार आहे. आता ती घरात पुन्हा कधी आणि कोणत्या ट्विस्टसोबत येते, हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 21, 2025 9:55 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
कुछ तो गडबड हैं! अमाल मलिकने गायलं रोमँटिक गाणं, लाजून लाल झाली तान्या मित्तल, VIDEO VIRAL