'शिवाजी पार्कातही मराठी माणूस नाही...', मुंबईतील अमराठी लोकांची संख्या वाढण्यावर स्पष्टच बोलले महेश मांजरेकर
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Marathi population in Mumbai : महेश मांजरेकर यांनी मुंबईतील मराठी माणसांची घटती संख्या आणि शिवाजी पार्कवरील मराठीपणाबद्दल चिंता व्यक्त केली.
मुंबई : मुंबईत मराठी माणसांची संख्या कमी होत आहे आणि अमराठी लोकांची संख्या वाढत आहे, ही चर्चा नेहमीच होते. काही दिवसांपूर्वीच मुद्द्यावरून राज्याभरात वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं होतं. यावेळी मराठी विरुद्ध हिंदी असं चित्र उभं राहिलं होतं. अशातच आता याच विषयावर प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. एका पुरस्कार सोहळ्यात बोलताना त्यांनी मुंबईतील मराठी माणसांबद्दल मनातील खंत बोलून दाखवली आहे.
पुरस्कार सोहळ्यात मांडलं मत!
महेश मांजरेकर नेहमीच त्यांच्या मुलाखतींमध्ये मराठीसाठी आग्रही असतात. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय…’ यांसारख्या चित्रपटांतूनही त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर आपलं मत मांडलं आहे. अशातच त्यांनी पुन्हा एकदा मुंबईतील मराठी माणसांच्या घटत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली आहे.
advertisement
नुकतंच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात महेश मांजरेकरांना "कमल शेडगे ज्येष्ठ रंगकर्मी" पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यावेळी बोलताना त्यांनी मुंबईतील मराठी माणसांच्या घटत्या संख्येबद्दल आपलं मत मांडलं. मांजरेकर म्हणाले, “मुंबईमध्ये मराठीपण कमी होत आहे. जे थोडंफार टिकलं आहे, ते पुणे आणि मुलुंडमध्ये आहे. आता तर शिवाजी पार्कवरही मराठी माणूस उरलेला नाही.”
advertisement
महेश मांजरेकरांचं हे विधान खूप महत्त्वाचं आहे. कारण, शिवाजी पार्क हे शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी एक हक्काचं ठिकाण मानलं जातं. विशेषतः मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बंगलाही याच परिसरात आहे. त्यामुळे मांजरेकरांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 21, 2025 10:22 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'शिवाजी पार्कातही मराठी माणूस नाही...', मुंबईतील अमराठी लोकांची संख्या वाढण्यावर स्पष्टच बोलले महेश मांजरेकर