नवरात्रीच्या पूर्वसंध्येला पुणे पोलिसांची मोठी कारवाई, टोळ्यांचं कंबरडं मोडलं, ४३ जणांना तुरुंगात धाडलं
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Pune Police: नवरात्र काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाया सुरू केल्या आहेत.
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : पुण्यात गणेशोत्सवाचा सण धुमधडाक्यात सुरू असताना आंदेकर-कोमकर यांच्यातील टोळीयुद्धातून आयुष कोमकर या महाविद्यालयीन तरुणाचा जीव गेल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर जोरदार टीका झाली. गणेशोत्सवाच्या आधी पोलिसांनी नामचिन आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे अपेक्षित असते. परंतु आंदेकर टोळीतील सदस्यांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनीच आयुषची हत्या केली. पूर्वानुभव लक्षात घेऊन नवरात्रीच्या पूर्वसंध्येला पुणे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून तब्बल ४३ जणांना तुरुंगात धाडले.
पुण्यासह राज्याभरात नवरात्रौत्सवाची लगबग सुरू झाली आहे. नवरात्र काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाया सुरू केल्या आहेत. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर आहेत. अनेक गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत गुन्हेगारांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
४३ आरोपींपैकी अनेक जण टोळीतील सदस्य
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आणि गुन्हेगारी टोळ्यांना आळा घालण्यासाठी झोन १ कडून आज ४३ जणांना तुरुंगात पाठविण्यात आले. ही सर्व कारवाई एका दिवसात करण्यात आली. यापैकी अनेक जण हे टोळीतील सदस्य आहेत. हत्यार कायद्याखालील आरोपी, दारूबंदीचे गुन्हेगार, कलम ३०७ अंतर्गत गुन्हे करणारे इत्यादींचा समावेश आहे.
advertisement
पोलीस प्रतिबंधात्मक कारवाई का करतात?
नवरात्र काळात होणारे संभाव्य गैरप्रकार, हिंसक घटना किंवा अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रतिबंधात्मक उपाययोजना करतात. दारू व्यवसायासंबंधी गुन्हेगारी किंवा इतर गैरकृत्यांमध्ये सामील असलेल्या गुन्हेगारांना अटक करून तुरुंगात टाकले जाते, जेणेकरून उत्सवादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा येणार नाही. पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार ही कारवाई केली जाते आणि यामुळे गर्दीच्या उत्सवादरम्यान संभाव्य धोका टाळला जातो.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 21, 2025 10:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नवरात्रीच्या पूर्वसंध्येला पुणे पोलिसांची मोठी कारवाई, टोळ्यांचं कंबरडं मोडलं, ४३ जणांना तुरुंगात धाडलं